डॉक्टरला खोटा धनादेश देणा-या दोघांना दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:28 IST2017-10-07T00:28:01+5:302017-10-07T00:28:01+5:30
येथील डॉ. हरीश्चंद्र वंगे यांना पुणे येथील दोघांनी " ३१ लाखांचा धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी न्यायालयाने दोघांना ६ महिन्याच्या कारावासाची व " ३१ लाख ६० दंडाची शिक्षा ठोठावली.

डॉक्टरला खोटा धनादेश देणा-या दोघांना दंड !
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील डॉ. हरीश्चंद्र वंगे यांना पुणे येथील दोघांनी " ३१ लाखांचा धनादेश दिल्याच्या आरोपावरून परळी न्यायालयाने दोघांना ६ महिन्याच्या कारावासाची व " ३१ लाख ६० दंडाची शिक्षा ठोठावली.
येथील डॉ. हरीश्चंद्र वंगे यांच्याकडून पुणे येथील तिरुपती इलेक्ट्रोकोटींग कंपनीचे भागीदार एकनाथ एस. हाके व दिलीप आलापुरे व्यवसाय वाढीसाढी २०१२ मध्ये वेळोवेळी "३१ लाख हातउसने घेतले होते. याबाबत आरोपींना मागणी केली असता त्यांच्या फर्मच्या संयुक्त खात्याचा कॅनरा बँक शाखा चिंचवड पुणे शाखेचा २०/०८/२०१३ रोजीचा "३१ लाखांचा धनादेश दिला. तो वटवण्यासाठी पाठवला असता तो वटला नाही म्हणून परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली. आरोपींनी सदर धनादेश चोरीला गेल्याचा बचाव करीत धनादेश चोरीला गेल्याबाबतची पुणे न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. याबाबत न्यायालयात साक्षीपुरावा होऊन आरोपीचा धनादेश चोरीचा बचाव फेटाळून लावला व आरोपीला उपरोक्त शिक्षा ठोठावली.
फिर्यादीच्या वतीने अॅड. वसंतराव फड यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. व्ही. बी. नागरगोजे, अॅड. आर. व्ही. गित्ते यांनी सहकार्य केले.