‘पेन किलर’ चे कार्य करते हास्य !
By Admin | Updated: October 20, 2016 01:42 IST2016-10-20T01:14:41+5:302016-10-20T01:42:00+5:30
औरंगाबाद : जुना अल्बम पाहताना आपण ज्या फोटोत हसलो होतो, तोच फोटो पाहणे आपण पसंत करतो. जर पाच सेकंदांसाठी केलेल्या हास्यामुळे आपला

‘पेन किलर’ चे कार्य करते हास्य !
औरंगाबाद : जुना अल्बम पाहताना आपण ज्या फोटोत हसलो होतो, तोच फोटो पाहणे आपण पसंत करतो. जर पाच सेकंदांसाठी केलेल्या हास्यामुळे आपला एखादा फोटो सुंदर येत असेल तर उभ्या आयुष्याचाच फोटो सुंदर करण्यासाठी निश्चितच खळखळून हसले पाहिजे, असे मत विनोदी कलाकार मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले. जैनम महिला मंचतर्फे महावीर भवन येथे आयोजित ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमात ते बोलत होते.
हसण्यामुळे शरीराला होणारे फायदे टिल्लू यांनी शास्त्रीय दाखले देऊन पटवून दिले. हसल्यामुळे मन प्रसन्न, आनंददायी राहते आणि हाच आनंद आपल्यामध्ये नवा आत्मविश्वास जागवतो. हसण्याचे फायदे पटवून देताना ते म्हणाले की, हसण्यामुळे श्वसनसंस्था मोकळी होते, रक्तवाहिन्या रुंदावतात, पोटाची हालचाल होऊन पचनसंस्थेचा व्यायाम होतो. तसेच मेंदूला आॅक्सिजनचा पुरवठा होतो. हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाला पू. कमलमुनीजी कमलेश म. सा., पू. घनश्याम मुनी म. सा., पू. कौशलमुनी म. सा., पू. अरिहंत मुनी म. सा. आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारती बागरेचा, कविता अजमेरा, करुणा साहुजी, मंगला गोसावी, मंगल पारख, सरोज काला, सुषमा साहुजी आदींची विशेष उपस्थिती होती. मंदा वायकोस व लता अन्नदाते यांनी मंगलाचरण सादर केले. मनीषा भन्साळी, मधू छाजेड, प्रेमा भन्साळी यांचे कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष सहकार्य लाभले. भावना सेठीया यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्या खिंवसरा, नंदा मुथा, कमला ओस्तवाल आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.