मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:06 IST2021-01-21T04:06:01+5:302021-01-21T04:06:01+5:30

औरंगाबाद : मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा बुलेट मोटारसायकलच्या धडकेने मृत्यू झाला. ही ...

Pedestrian killed in motorcycle crash | मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

औरंगाबाद : मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा बुलेट मोटारसायकलच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ३:४५ वाजेच्या सुमारास झाली.

पंडितराव गोपीनाथ फावडे (वय ६०, रा. दिवाणदेवडी, अंगुरीबाग ) असे मृताचे नाव आहे. फावडे हे

बुधवारी साडेतीन ते पावणेचार वाजता मोंढा नाका परिसरात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आकाशवाणीकडून क्रांती चौककडे निघालेल्या बुलेटचालकाने उड्डाणपूल ओलांडताना त्यांना धडक दिली. यात फावडे आणि बुलेट्स्वार नितीन भोजिये (रा. श्रीकृष्णनगर) हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने फावडे यांचा रात्री ७ वाजता मृत्यू झाला. सहायक फौजदार दत्ता बोटके तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in motorcycle crash