शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

वंशावळ शंभरीच्या उंबरठ्यावर !

By admin | Updated: August 18, 2015 00:06 IST

संजय तिपाले , बीड चारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील

संजय तिपाले , बीडचारा- पाण्याची सोय होत नाही म्हणून हतबल झालेले शेतकरी गुरांचा बेभाव बाजार करतअसताना दुसरीकडे मात्र, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एका शेतकरी कुटुंबाने गुरांच्या रक्षणाचे व्रत स्वीकारले आहे. एका गाईपासून सुरु झालेली गोसेवेची परंपरा आज तिसरी पिढीही तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहे. दुष्काळी परिस्थितीतही ते स्वत:कडील नव्वदपेक्षा अधिक व इतरांनी आणून सोडलेल्या वीस ते पंचवीस जनावरांचा सांभाळ करत आहेत.कडाजीराव कोंडीबा जाधव यांचे पवारवाडी शिवारातील देवकृपानगरात शेत आहे. त्यांचे वडील दिवंगत कोंडीबाराव जाधव यांनी ४० वर्षांपूर्वी गुंजथडी (ता. माजलगाव) येथील शेतकऱ्याकडून तांबड्या रंगाची गाय ४०० रुपयांत विकत आणली होती. अंगापिंढाने मजबूत असलेल्या या गाईचे पहिले वेत जाधव यांच्याचकडे झाले. या गाईला ते खूप जीव लावत. वासरांचाही कोंडीबाराव यांना पोटच्या लेकरागत लळा. त्यांनी ठरवले या गाईचे जित्राब अन् दूध कधीच विकायचे नाही. वासरू होवो अथवा कालवड दोन्हींचा ते आंनदाने सांभाळ करत. त्यामुळे गायीची वंशावळ वाढत गेली अन् गोठ्याला नंदनवनाचे स्वरुप येत गेले. २२ वर्षांपूर्वी गाय दगावली तेंव्हा घरातील माणूस गेल्याचे दु:ख जाधव कुटुंबियांना झाले होते. २००९ मध्ये कोंडीबाराव जाधव यांचे निधन झाले. कडाजीराव जाधव यांनी या गायीच्या वासराला पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावला. वडिलांनी गाईला आईप्रमाणे लावलेले प्रेम कडाजीराव यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी गोसेवेत कशाचीही कमी पडू दिली नाही. आता अप्पासाहेब, विठ्ठलराव तसेच मुंजाबा ही त्यांची तीन मुलेही त्यांना याकामी मदत करतात. गोसेवेला व्यापक स्वरुप देण्यासाठी जाधव यांनी गोठ्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दोन पूर्णवेळ मजूरही दिमतीला आहेत.एका गुराला महिन्याकाठी सर्वसाधारणे ८ क्विंटल ४० किलो चारा लागतो. जाधव यांच्या गोठ्यात १०० पेक्षा जास्त गुरे आहेत. त्यासाठी २५ लाख मेट्रीक टन चाऱ्याची महिन्याकाठी गरज भासते. आपल्या सात एकर शेतात त्यांनी घास, मका, ज्वारी, बाजरी पेरून चाऱ्याची तरतूद केली आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी दोन विहिरीतील पाणी चारा जगविण्यासाठी ठिबकद्वारे सोडले. जनावरांचे मूत्र पाईपद्वारे लगतच्या हौदात सोडले आहे. त्याला जोडूनच शेण साठविले जाते. शेण व मूत्र एकत्रित करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करतात. हेच खत नंतर शेतात वापरले जाते.गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माझ्या वडिलांनी आणलेल्या गायीची वंशावळ ९० च्या पुढे गेल्याचे पाहून आनंद होतो. मुलेही मोठ्या परिश्रमाने गुरांचा सांभाळ करतात. परिसरातील शेतकरी आपली गुरे आणून सोडत आहेत. दुष्काळी स्थितीत या गुरांचाही सांभाळ करायचा आहे. - कडाजीराव जाधव, शेतकरी