वाळूज महानगरात पदवीधरसाठी शांततेत मतदान
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:20+5:302020-12-03T04:10:20+5:30
वाळूज महानगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत वाळूजच्या मतदान केंद्रावर ५०२ तर ...

वाळूज महानगरात पदवीधरसाठी शांततेत मतदान
वाळूज महानगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत वाळूजच्या मतदान केंद्रावर ५०२ तर पंढरपुरातील मतदान केंद्रावर १ हजार २५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-शिवसेना व राष्ट्रवादी तसेच भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाळूज महानगरातील मतदान केंद्राजवळ सकाळपासून गर्दी केली होती. वाळूज व पंढरपूर जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर दिवसभर मतदार व कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. यावेळी मतदारयादीत नावे समाविष्ट असलेल्या मतदारांशी संपर्क करुन काही मतदारांना वाहने पाठवून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था केली होती. या निवडणुकीत गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोन केंद्रांवर ३१३७ पैकी १७५४ मतदारांनी बजावला हक्क
पंढरपुरातील जि. प. शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर एकूण २२५८ पैकी १२५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ८५२ पुरुष तर ४०० महिला मतदारांनी आपल्या पसंतीनुसार मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५५.४४ एवढी झाली आहे. वाळूजच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर ८७९ पैकी ५०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर ६३४ पैकी ३६० पुरुष तर २४५ पैकी १४२ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
-----------------------