५५ कोटींचा उतरविला पीकविमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:36 IST2017-08-10T23:36:49+5:302017-08-10T23:36:49+5:30

यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी सुमारे ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे

Pavpima has gone up 55 crores | ५५ कोटींचा उतरविला पीकविमा

५५ कोटींचा उतरविला पीकविमा

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यावर्षी तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी सुमारे ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे. एकीकडे पिकविमा भरणाºया शेतकºयांची संख्या गतवषीर्पेक्षा सव्वा लाखाने वाढली असली तरी दुसरीकडे प्रिमीअमची रक्कम मात्र गतवषीर्पेक्षाही कमी झाली आहे. यावर्षी शेतकºयांनी केवळ कापसाऐवजी इतर पिकांचाही विमा मोठ्या प्रमाणात उतरविल्याने प्रिमीअमची रक्कम कमी झाल्याचे निरीक्षण अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी नोंदविले आहे.
यावर्षी पेरणीनंतरपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारल्याने खरीप पिके सुकू लागली असून पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून ही वाढ झाली. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच तब्बल १२५ टक्के इतका पाऊस झाला होता. गतवर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी जिल्ह्यातील ५ लाख ५ हजार शेतकºयांनी ५७ कोटींचा पिकविमा भरला होता. यावर्षी सुरूवातीलाच चांगला पाऊस झाला. यामुळे दरवषीर्पेक्षा यंदा पेरण्याही लवकर उरकण्यात आल्या. मात्र पिकांची उगवण झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला असून बहुतांश भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.
पिकांची परिस्थिती वाईट असल्याने यावर्षी पिकविमा उतरविण्याला शेतकºयांनी पसंती देत आपली पिके संरक्षित करून घेतली. यावर्षी राष्ट्रीयीकृत बँक तसेच जिल्हा बँकेत मिळून ४ लाख ४३ हजार २०४ शेतकºयांनी एकूण ३४ कोटी ९८ लक्ष ६९ हजारांचा पिकविमा भरला. याशिवाय ई-महासेवा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने १ लाख ८७ हजार शेतकºयांनी तर ५ आॅगस्टला ई-महासेवा केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने १२ हजार ९११ शेतकºयांनी जवळपास २० कोटींचा पिकविमा भरला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाच्या पिकांसाठी एकूण ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी जवळपास ५५ कोटींचा पिकविमा उतरविला आहे.
बँकांमध्ये भरलेल्या पिकविम्याचा विचार केल्यास सर्वाधिक १३ कोटी १३ लाख रूपयांचा पिकविमा जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये भरण्यात आला आहे. याखालोखाल महाराष्ट्र ग्रामीण बँक व स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये भरण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Pavpima has gone up 55 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.