पावणेदोन लाख शेतकºयांनी दाखल केले आॅनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:23 IST2017-09-25T00:23:21+5:302017-09-25T00:23:21+5:30
कर्जमाफी योजनेसाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० कुटुंबियांनी कर्ज माफीचे अर्ज आॅनलाईन भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पावणेदोन लाख शेतकºयांनी दाखल केले आॅनलाईन अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कर्जमाफी योजनेसाठी २२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० कुटुंबियांनी कर्ज माफीचे अर्ज आॅनलाईन भरल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेचा लाभ दिला आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले होते. यासाठी १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत शासनाने जाहीर केली होती. परंतु, राज्यात विजेची टंचाई निर्माण झाल्याने अनेक भागांत भारनियमन घ्यावे लागले.
भारनियमनामुळे इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्य शासनाने २२ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ४२५ खातेदार शेतकरी आहेत.
या खातेदारांपैकी १ लाख ८० हजार ९४० कुटुंबांनी कर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरले आहेत. त्यामध्ये १ लाख ७७ हजार ५२६ कुटुंबांनी आधार क्रमांक आॅनलाईन अर्जासमवेत जोडला असून ३ हजार ४१४ कुटुंबांनी आधार क्रमांकाशिवाय आॅनलाईन अर्ज भरला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.