पावणेदोन लाखांचे दागिने लग्न घरातून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 00:47 IST2016-07-23T23:52:02+5:302016-07-24T00:47:56+5:30

अंभोरा : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे लग्नकार्यासाठी आलेल्या शिक्षक पत्नीचे पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी शुक्रवारी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Pavanodon lacquer jewelry ornaments from the house | पावणेदोन लाखांचे दागिने लग्न घरातून लंपास

पावणेदोन लाखांचे दागिने लग्न घरातून लंपास

अंभोरा : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे लग्नकार्यासाठी आलेल्या शिक्षक पत्नीचे पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले. याप्रकरणी शुक्रवारी अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
शिक्षक विकास बबन झोडगे रा. पुणे यांच्या मावस मेहुण्याचे लग्न पिंपळा (ता. आष्टी) येथे होेते. त्यासाठी ते पत्नी वर्षासमवेत पिंपळा येथे आले होते. वर्षा यांनी आपले दागिने बॅगमध्ये काढून ठेवले होते. रात्रीतून हे दागिने लंपास झाले. या दागिन्यांची किंमत एक लाख ८४ हजार ३२० रुपये इतकी होती. सर्वत्र शोधूनही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे झोगडे यांनी अंभोरा ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा नोंद झाला. तपास सहायक फौजदार डी. एस.साठे तपास करत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Pavanodon lacquer jewelry ornaments from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.