राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By Admin | Updated: June 13, 2014 00:32 IST2014-06-12T23:34:28+5:302014-06-13T00:32:44+5:30

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे.

PATS empire on the state highway | राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

कडा: बीड- धामणगाव- अहमदनगर या राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. यामुळे या मार्गावर वाहनांची संख्याही रोडावल्याने परिसरातील व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.
२००० साली सा.बां. विभागाने बीड-धामणगाव- अहमदनगर या राज्यरस्त्याचे डांबरीकरण केले. हा रस्ता चांगला झाल्याने व येथून रहदारी वाढल्याने रस्त्यालगत अनेक ठिकाणी हॉटेल, ढाबे, रसवंतीगृह आदी व्यवसाय ग्रामस्थांनी सुरू केले. या रस्त्यावरून रहदारी वाढल्याने रस्त्यालगतचे व्यवसायही भरभराटीस आले होते. विशेष म्हणजे या रस्त्यावर एकही टोलनाका नसल्याने येथून वाहनचालकही जाणे पसंत करीत. यामुळे येथे वाहनांची रात्रंदिवस वर्दळ असायची. हा राज्यरस्ता झाल्याने या रस्त्यावरील दौलावडगाव, कारखेल, मसोबावाडी, घाटापिंप्री, धामणगाव, डोईठाण, पांढरवारी, कोतन, अंमळनेर, डोंगरकिन्ही, लिंबादेवी आदी ठिकाणी बाजारपेठही बहरास आल्या. या परिसरातील अनेक शेतकरी आपला माल बीड, अहमदनगर आदी ठिकाणी घेऊन जाऊ लागले. यामुळे त्यांचेही जीवनमान उंचावले. तसेच राज्य महामार्ग झाल्याने इतर व्यवसायही भरभराटीस आले. असे असले तरी या रस्त्यामुळे झालेल्या प्रगतीस अवघ्या दोन ते तीन वर्षातच ब्रेक लागला.
या राज्य महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने येथून प्रवास करणे जिकिरीचे होऊ लागले. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होऊ लागले तर प्रवाशांनाही त्रास होऊ लागला. यामुळे येथून प्रवास करणे प्रवासी टाळू लागले. त्यामुळे या मार्गावरून जाणारी वाहने आष्टी, जामखेड मार्गे नगरकडे जाऊ लागली. नगर- पाथर्डी - गेवराई हा ही रस्ता महामार्ग झाला. त्यामुळे बीड- धामणगाव- नगर रस्त्यावरील वाहतूक कमालीची घटल्याचे दादासाहेब जगताप यांनी सांगितले. या रस्त्यावर वळण व पूलही धोकादायक आहेत. रस्त्यावरील खड्डयासह पुलांचीही दुरूस्त करण्यास सा.बा. विभागाकडून हयगय होत आहे. गंभीर बाब म्हणजे चौदा वर्षात एकदाच येथे दुरूस्तीचे काम झाले आहे. परिणामी येथील वाहतूक रोडावल्याने व्यवसाय, शेतकरी अडचणीत आले आहेत.
या संदर्भात सा.बां. विभागाचे उपअभियंता सुंदर पाटील म्हणाले, रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविण्यात येतील.

Web Title: PATS empire on the state highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.