समाजकल्याण सभापतीसह ११ जणांवर पाटोद्यात गुन्हा
By Admin | Updated: January 15, 2016 00:12 IST2016-01-14T23:47:48+5:302016-01-15T00:12:20+5:30
पाटोदा : रोहयोचे दप्तर चार्जमध्ये का दिले नाही ? या कारणावरून जि. प. समाजकल्याण सभापतींसह ११ जणांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना १९ डिस्ेंबर २०१५ रोजी घडली होती.

समाजकल्याण सभापतीसह ११ जणांवर पाटोद्यात गुन्हा
पाटोदा : रोहयोचे दप्तर चार्जमध्ये का दिले नाही ? या कारणावरून जि. प. समाजकल्याण सभापतींसह ११ जणांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना १९ डिस्ेंबर २०१५ रोजी घडली होती. उशिरा तक्रार दिल्यामुळे याप्रकरणी पाटोदा ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
जि.प. समाजकल्याण सभापती महेंद्र गोविंदराव गर्जे, स्वीय सहायक बाळासाहेब गंगाराम थोरवे, बालाजी सानप, पिनू हनुमंत सानप, विक्रम गंडाळ, भगवान आत्माराम नवले, दशरथ पंढरीनाथ भराटे, शहादेव महादेव पोकळे, युवराज गंडाळ, महादेव अडागळे यांचा आरोपींत समावेश आहे.
ग्रामविकास अधिकारी बबन रघुनाथ नागरगोजे यांच्याकडे सौताडा ग्रा.पं.चा चार्ज आहे. त्यांच्याकडे सुप्पा ग्रा.पं.चा अतिरिक्त पदभार आहे. येथील मग्रारोहयो कामाचे दप्तर प्रभार घेण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची नोंद आहे. (वार्ताहर)