पाटकर यांना मिळाली परवानगी
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:08+5:302020-11-28T04:16:08+5:30
उत्तराखंडमध्ये ५३० नवे रुग्ण डेहराडून : उत्तराखंडमध्ये कोरोनाचे ५३० नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच एकूण रुग्णांची संख्या ७३,५२७ झाली ...

पाटकर यांना मिळाली परवानगी
उत्तराखंडमध्ये ५३० नवे रुग्ण
डेहराडून : उत्तराखंडमध्ये कोरोनाचे ५३० नवे रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच एकूण रुग्णांची संख्या ७३,५२७ झाली आहे. राज्यात कोरोनामुळे १,२०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी डेहराडून जिल्ह्यात १६८ रुग्ण आढळले.
पुंडी धरणातून पाणी सोडले
चेन्नई : पुंडी धरणातून १,००० क्युसेक जास्तीचे पाणी सोडण्यात आले. तिरुवल्लूर जिल्ह्याच्या जवळ असेल्या या धरणाच्या परिसरात मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. तसेच निवार चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसामुळे कृष्णा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर आला.
मिझोराममधील शाळा बंदच राहणार
एजवेल : कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे मिझोराममधील शाळा यावर्षीच्या अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्री लालचंदामा रालते यांनी सांगितले की, राज्यातील शाळा मार्चपासून बंद आहेत. त्या या वर्षाखेरपर्यंत बंदच राहतील.
हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप
कैरो : सुदानचे माजी पंतप्रधान अल-महदी यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा मृतदेह संयुक्त अरब अमिरातमधून आणण्यात आला. अल-महदी (८४) हे नॅशनल उम्माह पार्टीचे ज्येष्ठ नेते होते. सुदानमध्ये १६ हजारांवर कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील १,२१५ जणांचा मृत्यू झाला.