भाजप तालुकाध्यक्षपदी पाटील

By Admin | Updated: March 28, 2016 00:13 IST2016-03-28T00:04:26+5:302016-03-28T00:13:31+5:30

कळंब : भाजपच्या कळंब तालुकाध्यक्षपदी प्रा. दिलीप पांडुरंगराव पाटील यांची निवड झाली. पक्षातील सर्व जुन्या इच्छुकांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या

Patil as President of BJP Taluka | भाजप तालुकाध्यक्षपदी पाटील

भाजप तालुकाध्यक्षपदी पाटील


कळंब : भाजपच्या कळंब तालुकाध्यक्षपदी प्रा. दिलीप पांडुरंगराव पाटील यांची निवड झाली. पक्षातील सर्व जुन्या इच्छुकांना टाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्या प्रा. पाटील यांच्या खांद्यावर पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी टाकली आहे.
तालुकाध्यक्षाची निवड मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला होता. इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने व अनेकांनी या पदासाठी दावेदारी केल्याने निवडीचा विषय लांबणीवर पडला होता. रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, संताजी चालुक्य, अ‍ॅड. खंडेराव चौरे, उमेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी इच्छुकांची संख्याही अचानक वाढल्याने पक्षश्रेष्ठींसमोर तालुकाध्यक्षपद निवडीचा पेच वाढला होता. प्रत्येकाशी चर्चा करून तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी प्रा. पाटील यांची तालुकाध्यक्षपदी निवड जाहीर केली. प्रा. पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये संजय पाटील दुधगावकर यांच्यासोबत भाजपत प्रवेश केला होता. जिल्हा बँक निवडणुकीत दुधगावकर यांच्याशी मतभेद झाल्याने प्रा. पाटील हे तत्कालीन जिल्हाध्यक्ष नितीन काळे गटामध्ये सहभागी झाले होते. तालुकाध्यक्ष पदासाठी प्रा. पाटील यांची वर्णी लागावी यासाठी काळे यांनीच पक्षाकडे जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (वार्ताहर)

Web Title: Patil as President of BJP Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.