रुग्णांची महागडी रक्त तपासणी होणार मोफत

By Admin | Updated: May 24, 2017 00:40 IST2017-05-24T00:39:42+5:302017-05-24T00:40:38+5:30

जालना : जिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोर गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत होता. अशा रुग्णांना मोफत रक्त तपासणी मिळणार आहे.

Patients get expensive blood check | रुग्णांची महागडी रक्त तपासणी होणार मोफत

रुग्णांची महागडी रक्त तपासणी होणार मोफत

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील गोर गरीब रुग्णांना रक्त तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागत होता. आता अशा रुग्णांना मोफत रक्त तपासणी करून मिळणार आहे. शासनाने एका खाजगी संस्थेशी याबाबत करार केला आहे. संपूर्ण चाचण्या रुग्णाला मोफत मिळणार असून, शासन संबंधित एजन्सीला पैसे देणार आहे.
शासकीय रुग्णालयात रक्तांची तपासणी होते. मात्र यातून मलेरिया, मधुमेह आदीबाबत तपासणी होत. इतर आजांरासंदर्भात तपासणी करण्यासाठी खाजगी लॅबचा आधार घ्यावा लागत असे. एचसीएल या खाजगी संस्थेसोबत करार करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयात संबंधित एजन्सीचे कार्यालय असणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालात सदर लॅब असणार असून, संबंधित एजन्सीचे संपूर्ण जिल्हाभरात नेटवर्क असणार आहे. किडणीचे आजार, लिव्हर, लिक्वीड प्रोफाईल सह अन्य काही आजारांच्या चाचण्या एचसीएल एजन्सी रुग्णास करून देईल. जिल्ह्यात एक जिल्हा रुग्णालय, सहा उपजिल्हा रूगणालय व जिल्हा परिषदेचे ४० आरोग्य केंद्र, तर २१३ उपकेंद्र आहेत. जिल्हा रुग्णालयात सुमोर शंभर ते दीडशे ओपीडी असते तर आरोग्य केंद्रात ३० ते ४० रुग्णांची ओपीडी असते. यातील बहुतांश रुग्णांना काही आजाराची लक्षण आढळून आल्यास तालुका अथवा जिल्हास्थानी यावे लागे. मात्र आता नवीन सुविधेमुळे एचसीएल या संस्थेचा प्रतिनिधी त्या केंद्रात जाऊन रुग्णाचे रक्त नमुने घेऊन एक अथवा दुसऱ्या दिवशी त्याला नमुन्याचा अहवाल मिळेल.

Web Title: Patients get expensive blood check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.