रुग्णसेवा कोलमडली

By Admin | Updated: April 27, 2015 00:57 IST2015-04-27T00:51:44+5:302015-04-27T00:57:28+5:30

तामलवाडी : ऊसतोड मजुरांना गावाकडे घेवून जाणाऱ्या टेम्पोला मालवाहतूक करणाऱ्या पीकअपने समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी तर

The patient service collapsed | रुग्णसेवा कोलमडली

रुग्णसेवा कोलमडली



तामलवाडी : ऊसतोड मजुरांना गावाकडे घेवून जाणाऱ्या टेम्पोला मालवाहतूक करणाऱ्या पीकअपने समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी तर दहा ऊसतोड मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर सांगवी (काटी) झोपडपट्टीनजीक रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील कोंडावळा गावचे ऊसतोड मजूर हे कर्नाटक राज्यातील इंडी तालुक्यातील साखर कारखान्यावर ऊस तोडीसाठी गेले होते. कारखाना बंद झाल्याने हे मजूर रविवारी रात्री माल वाहतूक टेम्पो (क्र. के. ए. २८ बी १४५७) मध्ये बसून तुळजापूर मार्गे नंदूरबारकडे निघाले असता, रविवारी पहाटे तुळजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या पीकअप (क्र. के.ए.२८ सी. १५९४) ने टेम्पोला समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये टेम्पोचालक सुरेश हणमंत पवार (रा. पिंपरी चिंचवड) व पीकअप चालक दिनेश काळे (रा. पडतारवाडी ता. अथणी, जि. बेळगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. तर टेम्पोमधील प्रकाश मोरे, कल्पना मोरे, नितीन मोरे, कुशल मोरे, कल्पनाताई मोरे, मिराबाई जाऊ, रमेश मोरे (सर्व रा. कोंडावळा, जि. नंदूरबार) हे किरकोळ जखमी झाले.
गंभीर जखमींवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद तामलवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी घेवून जाण्याकरीता शासनाने १०८ हा टोल फ्री क्रमांकावर माहिती देवून रुग्णवाहिका बोलाविण्याची सुविधा आहे. सांगवीजवळ अपघात घडल्यानंतर पहाटे साडेपाच वाजता पोलिस कर्मचाऱ्यांनी १०८ नंबरवर फोन लावला असता, फोन बंद होता. त्यामुळे अडवलेल्या चालकास उपचारासाठी घेवून जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर तामलवाडी पोलिसांनी पोलिस वाहनातून दोन्ही जखमी चालकांना दवाखान्यात दाखल करावे लागले. तर फोन केल्यानंतर अर्ध्या तासानंतर रुग्णवाहिका पोहंचते. त्यामुळे तुळजापूर तालुक्यात रुग्णसेवा देण्याची सुविधा कोलमडली आहे. त्यामुळे जखमीच्या नातेवाईकांत संताप व्यक्त होत आहे. अपघातप्रकरणी टेम्पोचालक सुरेश हणमंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पीकअप चालकाविरुद्ध तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The patient service collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.