रुग्णसेवेचे मिशन बिगिन अगेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:37+5:302020-11-12T07:28:37+5:30
औरंगाबाद : घाटीत मिशन बिगिन अगेनद्वारे रुग्णसेवा पूर्वपदावर आणली जात आहे. नियमित शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर आता मेडिसीन विभागातील रुग्णसेवा ...

रुग्णसेवेचे मिशन बिगिन अगेन
औरंगाबाद : घाटीत मिशन बिगिन अगेनद्वारे रुग्णसेवा पूर्वपदावर आणली जात आहे. नियमित शस्त्रक्रिया सुरू केल्यानंतर आता मेडिसीन विभागातील रुग्णसेवा सुरू करण्यात येत आहे.
मेडिसीन विभागात ७ महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात होते; परंतु आता याठिकाणी केवळ संशयित आणि निगेटिव्ह रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मेडिसीन विभागातील रुग्णसेवा पूर्वपदावर येणार आहे. घाटीत मार्चपासून कोरोनाच्या संशयित आणि पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामध्ये मेडिसीन विभागाच्या इमारतीत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले होते. येथील एमआयसीयू सीव्हीटीएस विभागात हलविण्यात आला होता. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आता मिशन बिगिग अगेनमध्ये घाटीतील रुग्णसेवा पूर्वपदावर आणली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांवर सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत उपचार होतील, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.
सुपर स्पेशालिटीत २५० खाटा
सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत कोरोना रुग्णांसाठी २५० खाटांची व्यवस्था आहे. आजघडीला याठिकाणी ८६ रुग्ण दाखल आहेत, अशी माहिती विशेष कार्यअधिकारी डाॅ. सुधीर चौधरी यांनी दिली.