सेव्हन हिल उड्डाणपुलावरील पथदिवे शॉर्ट

By Admin | Updated: May 6, 2014 17:02 IST2014-05-06T16:46:19+5:302014-05-06T17:02:09+5:30

सेव्हन हिल उड्डाण पुलावरील पथदिवे शॉर्ट

The pathway short on the Seven Hill flyover | सेव्हन हिल उड्डाणपुलावरील पथदिवे शॉर्ट

सेव्हन हिल उड्डाणपुलावरील पथदिवे शॉर्ट

औरंगाबाद : महापालिकेने औरंगाबादकरांच्या जिवाला धोका निर्माण करणारे पथदिवे सेव्हन हिल उड्डाण पुलावर बसविले असून ५० टक्के दिवे शॉर्ट झाले आहेत. पावसामुळे एलईडी बल्ब शॉर्ट झाल्याचा दावा विद्युत विभाग करीत आहे. पुलावरील सर्व बल्बचा प्रकाश कमी झाला आहे. बँ्रडेड कंपनीच्या बल्बऐवजी निकृ ष्ट दर्जाचे बल्ब बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या वादात दीड वर्ष पूल अंधारात राहिल्याने पुलावर लहान-मोठे अपघात झाले. अखेर मनपाने पुलावर पथदिवे बसविण्याची जबाबदारी जानेवारी २०१२ मध्ये घेतली. बांधकाम विभागाने बसविलेले ८० पथदिवे पालिकेने काढून टाकले; मात्र नवीन पथदिवे बसविण्यासाठी सव्वा वर्ष लावले. ५० लाख रुपयांच्या खर्चातून पथदिवे बसविण्यास मुहूर्त लागला. जानेवारी २०१३ मध्ये खांब बसविण्याचे काम सुरू झाले. मजबूत असा आधार न देता ते खांब बसविण्यात आले आहेत.
तांत्रिक त्रुटी
६० पथदिवे उड्डाण पुलावर बसविले आहेत. प्रत्येक खांबाचे वजन ५० किलो इतके आहे. तीन क्लॅम, चार इंची आकाराचे सहा नट व अर्धा इंची जाडीच्या लोखंडी बॉक्स पॅलेटमध्ये तो खांब बसवून त्यावर दिवा लावण्यात आला आहे. खांबांची अलाईनमेंट केलेली नाही.
२ वर्षांचा दावा ठरला फोल
ते खांब फायबर रिपोर्सपासून बनविले आहेत. बल्ब-खांबांना दोन वर्षे काहीही होणार नाही, असा दावा मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी केला होता. कामावर ५० लाखांचा खर्च झाला आहे. बजाज या मूळ कंत्राटदाराने लोकल कंत्राटदाराकडून काम करून घेतले आहे. खांब एअरपॅक असून, त्यामध्ये पाणी जाण्यास वाव नाही. त्यामुळे ते गंजून पडण्याची सुतराम शक्यता नाही, असाही दावा त्यांनी केला होता.
७ हजारांत १२ तास प्रकाश
बी अँड सीने २००१ मध्ये उड्डाण पूल बांधून ८० पथदिवे बसविले. ११ वर्षे ते पथदिवे टिकले. पालिकेच्या पथदिव्यांना २ वर्षांची वॉरंटी असताना ते वर्षभरातच शॉर्ट झाले. ५० लाखांत दोन वर्षे. दोन वर्षांत ७३० दिवस. प्रत्येक दिवसाला ६ हजार ८४९ रुपये खर्च करून पुलावर १२ तास प्रकाश पडेल. पालिकेच्या तुलनेत बांधकाम विभागाने बसविलेले खांब चांगले होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: The pathway short on the Seven Hill flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.