नकुशीला अनाथालयाच्या पाळण्यात ठेवून माता पसार

By | Updated: December 4, 2020 04:05 IST2020-12-04T04:05:18+5:302020-12-04T04:05:18+5:30

उस्मानपुरा परिसरातील साकार संस्थेच्या दारात अनाथांसाठी पाळणा ठेवलेला आहे. १ डिसेंबरच्या रात्री १:४९ वाजता अज्ञात मातेने तिचे चार दिवसांचे ...

Passing the mother by keeping Nakushi in the orphanage | नकुशीला अनाथालयाच्या पाळण्यात ठेवून माता पसार

नकुशीला अनाथालयाच्या पाळण्यात ठेवून माता पसार

उस्मानपुरा परिसरातील साकार संस्थेच्या दारात अनाथांसाठी पाळणा ठेवलेला आहे. १ डिसेंबरच्या रात्री १:४९ वाजता अज्ञात मातेने तिचे चार दिवसांचे बाळ पाळण्यात ठेवले आणि ती पसार झाली. थंडीमुळे रडणाऱ्या चिमुकलीच्या आवाजाने संस्थेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली. त्यांनी तिला आत नेऊन मायेची ऊब दिली. ही बाब समजताच साकारचे बालकल्याण व्यवस्थापक विजय मगरे यांनी बालिकेच्या मातेविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Passing the mother by keeping Nakushi in the orphanage