पुण्याला जाणारे प्रवासी ताटकळले
By Admin | Updated: May 26, 2014 01:17 IST2014-05-26T01:06:39+5:302014-05-26T01:17:14+5:30
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

पुण्याला जाणारे प्रवासी ताटकळले
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. अचानक बस रद्द झाल्याने प्रवासी आणि स्थानकावरील चालक- वाहक, कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. जवळपास तासाभरानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकात दुपारी एक वाजता शिवनेरी बसने पुण्याला जाण्यासाठी प्रवासी आले होते. बस नादुरुस्त झाल्यामुळे ती रद्द करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. अचानकपणे बस कशी रद्द करण्यात आली, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. आजारी व्यक्ती सोबत असून, उपचारासाठी पुण्याला लवक रात लवकर पोहोचायचे आहे; परंतु स्थानकावर आल्यावर बस रद्द झाली असून, तिकिटाचे पैसे परत देण्यात येतील, असे स्थानकातील कर्मचार्यांनी प्रवाशांना सांगितले. त्यामुळे प्रवासी आणखी भडकले. त्वरित पर्यायी बसची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. काही वेळ प्रवासी आणि कर्मचार्यांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली. तात्काळ दुसरी बस सोडण्याची मागणी प्रवाशांनी लावून धरली. अखेर प्रवाशांच्या मागणीसमोर मंडळाने गुडघे टेकले. त्यांनी त्वरित दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुसर्या बसची व्यवस्था केली. दुपारी एक वाजता रवाना होणारे प्रवासी दुपारी दोन वाजता औरंगाबादेतून निघाले. मात्र, पुन्हा दुपारी दोन वाजेच्या बसने जाणार्या प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी पुढील बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागले. एखादी जादा बस हवी औरंगाबादहून पुण्याला जाणार्यांची संख्या बरीच आहे. खाजगी ट्रॅव्हल्सपेक्षा एस. टी. महामंडळाच्या शिवनेरी बसला अनेक नागरिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अचानक बस नादुरुस्त झाल्यास प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी किमान एखादी जादा बस ठेवण्याची मागणी यावेळी प्रवाशांनी केली. नादुरुस्त बस एक बस अचानक नादुरुस्त झाल्यामुळे दुपारी एक वाजेची शिवनेरी बस रद्द करावी लागली. तरीही या प्रवाशांची पुढील वेळेतील बसमध्ये प्रवासाची सुविधा करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) प्रताप जाधव यांनी दिली.