शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची तारांबळ सुरूच

By admin | Updated: March 17, 2016 00:23 IST

औरंगाबाद : शहरात आॅटोरिक्षांसाठी करण्यात आलेल्या ‘मीटर सक्ती’चा फटका सर्वसामान्य प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, परीक्षार्थी, कामगार, मजुरांना बसत आहे.

औरंगाबाद : शहरात आॅटोरिक्षांसाठी करण्यात आलेल्या ‘मीटर सक्ती’चा फटका सर्वसामान्य प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी, परीक्षार्थी, कामगार, मजुरांना बसत आहे. सीटर रिक्षातून प्रवास करताना पूर्वी १० ते २० रुपये द्यावे लागत होते. परंतु आता ७० ते १०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर बसचा आधार घेण्यावर भर दिला जात आहे. परंतु अपुऱ्या संख्येमुळे प्रत्येक बस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून धावत आहेत. मीटर सक्तीच्या दुसऱ्या दिवशीही हीच परिस्थिती कायम होती. पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईच्या धाकामुळे बहुतांश रिक्षाचालक सीटरने जाण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पूर्वी १० ते २० रुपयांत होणाऱ्या प्रवासासाठी ७० ते १०० रुपये मोजण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, मजूर आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दोन वेळच्या प्रवासासाठी दररोज १०० ते २०० रुपये क से खर्च करता येतील, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. तर दिवसभराची मजुरी ३०० रुपयांपर्यंत असताना केवळ रिक्षाला १००-१५० रुपये मोजून घर खर्च कसा भागविणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अशात पर्याय असलेल्या शहर बसेस वेळेवर येत नाहीत. किफायतशीर प्रवासासाठी शहर बसेसची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे काही कामगारांनी सांगितले.