सलग सुट्यांनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी
By Admin | Updated: October 6, 2014 00:42 IST2014-10-06T00:17:10+5:302014-10-06T00:42:06+5:30
औरंगाबाद : सलग सुट्या आल्यामुळे पुण्याला जाण्यासाठी रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली.

सलग सुट्यांनंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी
औरंगाबाद : सलग सुट्या आल्यामुळे पुण्याला जाण्यासाठी रविवारी मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली. शिवनेरी, बसगाड्यांचे दिवसभरातील फेऱ्यांचे आरक्षण फुल झाले होते. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांची काहीशी गैरसोय झाली. प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या.
नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यास जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. शनिवार आणि रविवारच्या सुटीमुळे प्रत्येक आठवड्यात या मार्गावर प्रवाशांची गर्दी असते. दसरा, शनिवार, रविवारच्या सुटीनंतर पुण्याला जाणाऱ्यांची मध्यवर्ती बसस्थानकात मोठी संख्या दिसून आली. पुण्याच्या प्रवासासाठी अनेकांकडून शिवनेरी बसला प्राधान्य दिले जाते.
रविवारी दुपारी १२ ते ४, सायंकाळी ६ आणि ७ वाजेच्या शिवनेरी बसचे आरक्षण फुल झाले होते. शिवाय निमआराम बसगाड्यांनाही मोठी गर्दी झाली. प्रवासी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन या मार्गावर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले होते. बस येण्याची वाट पाहत अनेकांना ताटकळावे लागले.