शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात इंडिगोच्या विमानाने प्रवासी आले; पण बॅगा दिल्लीतच राहिल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:41 IST

सलग दोन दिवस प्रकार, ‘कालच्या आज, आजच्या बॅगा उद्या’

छत्रपती संभाजीनगर : इंडिगोच्या दिल्ली- छत्रपती संभाजीनगरविमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग दोन दिवस वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले. विमानाने प्रवासी शहरात दाखल झाले; परंतु त्यांच्या बॅगा दिल्लीतच राहिल्या. याविषयी प्रवाशांनी बुधवारी सायंकाळी विमानतळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

इंडिगोची शहरातून दिल्लीसाठी नियमित प्रवासी सेवा चालू आहे. मंगळवारी दिल्लीहून आलेल्या काही प्रवाशांचे सामान त्यांच्या बरोबर आलेच नाही. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीदेखील असाच प्रकार घडला. दिल्लीहून आलेले प्रवासी विमानतळावर बॅगेसाठी वाट पाहत उभे होते. मात्र, बराच वेळ जाऊनही बॅगा न आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अनेक वाट पाहूनही बॅग न आल्याने प्रवाशांनी यासंदर्भात इंडिगो आणि विमानतळावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्रवाशांकडून बॅगांसंदर्भात सविस्तर माहिती घेण्यात आली. यासंदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला.

१५ ते २० प्रवाशांना मनस्तापदिल्लीहून बुधवारी आलेल्या जवळपास १५ ते २० प्रवाशांच्या बॅगा आलेल्या नव्हता. या प्रवाशांच्या बॅगा गुरुवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने शहरात दाखल होतील, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मंगळवारच्या बॅगा दाखलमंगळवारी ज्या प्रवाशांच्या बॅगा दिल्लीत राहिल्या होत्या, त्यांच्या बॅगा या बुधवारच्या विमानाने दाखल झाल्याचेही विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या प्रवाशांना स्वत: बॅगा घेऊ जाता येईल, त्यांना विमानतळावर बॅगा दिल्या जातात आणि ज्यांना शक्य होत नाही, त्यांच्या बॅगा घरपोच दिल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरairplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ