प्रवाशांची हेटाळणी !
By Admin | Updated: September 18, 2014 00:41 IST2014-09-18T00:15:02+5:302014-09-18T00:41:05+5:30
सोमनाथ खताळ , बीड जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी

प्रवाशांची हेटाळणी !
सोमनाथ खताळ , बीड
जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात प्रवाशांना बसगाड्यांबद्दल माहिती देण्यासाठी वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती केलेली आहे़ मात्र हे वाहतूक नियंत्रक प्रवाशांना माहिती देण्याऐवजी त्यांना अरेरावीची भाषा करीत आहेत. त्यांच्याबद्दल तक्रारी देण्यास प्रवाशांचीही उदासिनता आहे़ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवाशांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यास वेळ नाही़ बुधवारी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून महामंडळातील वाहतूक नियंत्रकांकडून प्रवाशांची हेटाळणी होत असल्याची माहिती समोर आली आहे.
‘प्रवासी हेच आमचे दैवत. आम्ही सौजन्यशील आहोत, प्रवाशांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे. आम्ही आमचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवू.’ हे वाक्य ऐकून कोणालाही महामंडळाच्या कामावर संशय येणार नाही. मात्र प्रत्यक्षात या वाक्याचा कुठलाच प्रत्यय जिल्ह्यातील बसस्थानकामध्ये आढळून येत नाही. बसस्थानकातील वाहतूक कक्षांची पाहणी करण्यात आली. वाहतूक नियंत्रकाकडून प्रवाशांना अपेक्षित माहिती दिली जाते का? प्रवासी वाहतूक नियंत्रकांकडे शांतपणे माहिती विचारतात का? त्यातून समाधान होते का? माहिती न मिळाल्यास प्रवासी तक्रार करतात का? प्रवासी त्यांच्याशी हुज्जत घालतात का? यासारखे विविध प्रश्न घेऊन १०० प्रवाशांना विचारण्यात आले. यातून महामंडळाबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप असल्याचे समोर आले.
६० टक्के लोक आजही बसनेच प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी महामंडळाच्या बसनेच प्रवास करण्यास सर्वसामान्य प्रवासी अधिक पसंती देत आहेत. निम्म्याहून अधिक प्रवासी वाहतूक नियंत्रकाकडे जावून बसबद्दल माहिती विचारतात. ४० टक्के लोकांचे म्हणणे आहे की आम्हाला माहिती दिली जात नाही तर तेवढ्याच प्रवाशांचे म्हणणे आहे की कधीतरी माहिती दिली जाते. माहिती विचारल्यावर प्रवाशांवर चिडचिड होत असून वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. प्र्रवाशांचीही तक्रारी देण्यास उदासीनता असून दिलेल्या तक्रारींचे निरसणच होत नसल्याचे ८० टक्के प्रवाशांचे म्हणणे आहे.
प्रभारी आगारप्रमुख भूसारी यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी माझ्याकडे तक्रारी आल्या की शहानिशा करून थेट कारवाई करतो. प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही नेहमी प्रयत्न करू. तक्रार द्या, थेट कारवाई करतो. कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगितले.
आपण बसने प्रवास करता का ?
२़आठवड्यातून किती वेळा बसने प्रवास करता ?
३़वाहतूक नियंत्रकाकडे चौकशीसाठी आपण जाता का ?
४़आपण त्यांना व्यवस्थीत माहिती विचारता का ?
५़वाहतूक निंयत्रक आपल्याला अपेक्षीत माहिती देतात
का ?
६़ वाहतूक नियंत्रक आपल्यावर चिडचिड करतात का ?
७़माहिती न दिल्यास आपण काय करता ?
८़वरीष्ठांचे दुर्लक्ष होत आहे असे आपणाला वाटते का ?
९़तक्रारीचे निरसण होते का ?
१०़ बसमध्ये पुरेशा सुविधा मिळतात का ?
ा्रत्येक बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी एक तक्रार पेटी असते. मात्र कुठल्याच स्थानकात या पेट्या नाहीत. याची ना अधिकाऱ्यांना काळजी आहे ना प्रवाशांना. प्रवाशीही तक्रारी देण्यास पुढे येत नाहीत.
वाहतूक नियंत्रक कक्षात बसगाड्यांची चौकशी करण्यासाठी येणारे हे जास्तीत जास्त असुशिक्षीत आणि ग्रामीण भागातील असतात. या लोकांना नियमांची माहिती नसते. त्यांना योग्य माहिती देऊन आपले कर्तव्य बजवावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.