काम करणाऱ्या नेतृत्वाला पक्षाने न्याय दिला
By Admin | Updated: June 9, 2014 01:10 IST2014-06-09T01:02:47+5:302014-06-09T01:10:43+5:30
सिल्लोड : स्वत:च्या कर्तृत्वावर जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेतृत्वाला राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड करून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकांना न्याय देण्याचे काम केले.

काम करणाऱ्या नेतृत्वाला पक्षाने न्याय दिला
सिल्लोड : स्वत:च्या कर्तृत्वावर जनतेच्या मनात घर करणाऱ्या नेतृत्वाला राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड करून काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याकांना न्याय देण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.
एक हार से ना कोई फकीर बनता है। ना एक जीत से कोई अमीर बनता है।
अशी शायरी करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये पुन्हा आघाडीचे सरकार येईल, असे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
अब्दुल सत्तार यांची पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सिल्लोड येथे रविवारी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून राजेंद्र दर्डा बोलत होते. तर स्वागताध्यक्ष जि.प.चे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या अध्यक्षा शारदाबाई जारवाल, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे (औरंगाबाद), भीमराव डोंगरे (जालना), काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रभान पारखे, आ. डॉ. कल्याण काळे, आ. चंद्रकांत दानवे, आ. कैलास गोरंट्याल, आ. सुरेश जेथलिया, आ. संजय वाघचौरे, आ. सुभाष झांबड, भाऊसाहेब ठोंबरे, माजी आ. नितीन पाटील, नामदेव पवार, माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शोभाबाई खोसरे, माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी (वैजापूर), उपनगराध्यक्ष जितसिंग करकोटक (पैठण), नगराध्यक्ष संजय जाधव (गंगापूर), माजी नगराध्यक्ष संदीप दारुंटे, नगरसेवक नईम मन्सुरी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अशोक मगर (कन्नड), भगवान तांबे (वैजापूर), सुदाम मते (फुलंब्री), सुरेश तळेकर (भोकरदन), गणेशराव दौड (सिल्लोड), पं.स.च्या सभापती रेखा जगताप (सिल्लोड), नंदा आगे (सोयगाव), वैजापूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष बाळू संचेती, जिल्हा परिषदचे गटनेते विनोद तांबे, भरत राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष किरण पवार, गटनेता नंदकिशोर सहारे, जि.प.सदस्य श्रीराम महाजन, बाबूराव चोपडे, कल्पना लोखंडे, कौतिकराव मोरे, रामदास पालोदकर, केशवराव तायडे, पपिंद्रपालसिंग वायटी, विजय दौड, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर, नगरसेवक अशोक साळवे, रऊफ बागवान, राजू गौर, शंकरराव खांडवे, मनोज झंवर, मधुकर बेंडाळे, सय्यद अजीज, हनिफ मुलतानी, गिरीश शहा काँग्रेस- राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी यांनी केले.(वार्ताहर)
मिरवणूक व फटाक्यांची आतषबाजी
अब्दुल सत्तार यांची शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. अब्दुल सत्तार सहाब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, या जयघोषाने व फटाक्यांच्या आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजराने सिल्लोड शहर दुमदुमले होते. औरंगाबाद नाका ते डॉ. आंबेडकर चौकापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी व्यापारी संघटनेकडून अब्दुल सत्तार यांची लाडूतुला करण्यात आली. मिरवणूक तीन तास चालली.
कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणार -अब्दुल सत्तार
पक्षाने दिलेल्या संधीचा उपयोग आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार असून चार महिन्यांत जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
राजेंद्र दर्डा यांना कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढण्याचा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.