शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

अंशतः लाॅकलाडऊन : अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा; दहावी-बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांतून चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:30 PM

Partly Lockdown in Aurangabad ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे.

ठळक मुद्देअभ्यासक्रम, प्रात्यक्षिकाचे कसे होणार, हा प्रश्न अनुत्तरितच

औरंगाबाद : जिल्ह्यात दि. ११ मार्च ते दि.४ एप्रिलपर्यंत अंशतः लाॅकलाडऊन घोषित केल्यामुळे शाळा, महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अवघ्या दीड महिन्यावर परीक्षा आलेल्या असताना विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षकांना आता अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक पूर्ण कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३ नोव्हेंबरला तर शहरात ४ जानेवारीपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जातात. यावर्षी कोरोनामुळे २३ एप्रिल ते २१ मे, तर दहावीची २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाने जाहीर केले आहे.

ऑनलाइनमध्ये अनेक ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण झाले. मात्र, विद्यार्थ्यांना किती आकलन झाले, हा अद्यापही संशोधनाचा विषय आहे. तांत्रिक अडचणींमुळे ३० ते ४० टक्केच विद्यार्थी ऑनलाइन शिकू शकले. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात अध्ययन, अध्यापन, प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांच्या शंकांच्या समाधानावर भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीही ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मात्र, प्रत्यक्ष वर्ग बंद होणार असल्याने पुन्हा त्याच तांत्रिक अडचणी, परीक्षा दिवसागणिक जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांतून परीक्षेबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होईलपरीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या असल्याने मार्च आणि एप्रिलच्या काही दिवसांत हा अभ्यासक्रम, प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी मिळाले होते. सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून हे प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. ते सुरू ठेवायला हवे होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.-रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद

ऑनलाइन सुरू राहीलजिल्हाधिकारी महोदयांशी बोलणे झाले, त्यानुसार केवळ ऑनलाइन शिक्षण सुरू राहील. शाळा, शिकवण्या, क्लासेस यांना प्रतिबंध आहे. त्यामुळे दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्गही बंद राहतील. त्यामुळे दहावी, बारावीचा अभ्यासही ऑनलाइनच सुरू राहील.-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

दहावीचे विद्यार्थी ६५,०११बारावीचे विद्यार्थी ५५,१७७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद