सोमनाथ खताळ , बीडदुपारच्या सुटीत जेवणासाठी गेलेले बीड पालिकेतील काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळवर परत येत नसल्याची धक्कादायक माहिती सोमवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टींग’मधून समोर आली. नगररचना, बांधकाम व विद्यूत विभागात एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हता. सीओ, पाणी पुरवठा अभियंता व सुवर्ण जयंती विभागाचे प्रकल्प संचालक या तीन अधिकाऱ्यांशिवाय एकही विभाग प्रमुख हजर नसल्याचे दिसून आले.विजेचा अपव्ययपहिल्याच मजल्यावर कार्यालयीन विभाग असून दुपारच्या सुटीनंतर अर्धा तास झाला तरी या विभागात एकही कर्मचारी हजर नव्हता. परंतु येथील पंखे, बल्ब, ट्यूब मात्र सुरू होते. प्रशासकीय अधिकारीही उपस्थित नव्हते. विविध कामांसाठी आलेले १० ते १५ महिला पुरूष या विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्षेत होते.स्वच्छता विभागात गर्दीस्वच्छता व आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक हे जुना बाजार येथील मास्टर प्लॅनच्या कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. दोन कर्मचारी उपस्थित होते.सुवर्ण जयंतीत प्रकल्प संचालकयेथील सुवर्ण जयंती विभागात प्रकल्प संचालक कुरेशी, वरिष्ठ लिपीक कदम व दोन महिला कर्मचारी काम करीत होत्या. महिला कर्मचाऱ्यांसमोर महिलांची गर्दी होती. सभापतीही उपस्थित होते.शिपायाच्या हातात विद्यूत विभागविद्युत विभागात एकही अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते. येथील शिपाई ओळखीच्या लोकांना सोबत गप्पा मारताना दिसून आले. साहेब जेवण करून आले नाहीत, काय काम आहे, सांगा मी करतो, असे सांगून आपणच विद्यूत विभागाचे कारभारी आहोत, असे शिपायाने दाखवून दिले.लेखा विभागात तीन कर्मचारीलेखा विभागातील लेखापाल गणेश पगारे हे मुख्याधिकारी यांच्या केबीनमध्ये कामासाठी गेले होते. येथील वाघ यांच्यासह एक महिला व एक पुरूष कर्मचारी काम करीत होते. इतर मात्र गायब होते.बांधकाम, नगररचना विभागात शुकशुुकाटबांधकाम विभागात अभियंता, लिपीक किंवा शिपाई कोणीच दिसून आले नाही. या विभागात शुकशुकाट होता. दरवाजा बाहेर दहा ते पंधरा नागरीक अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेटींग करीत होते. नगर रचना विभागातील सहायक नगर रचनाकार लईक व एजाज हे दोन्ही कर्मचारी सीओंच्या केबीनमध्ये मास्टर प्लॅनच्या कामाच्या माहिती देण्यासाठी गेल्याचे दिसून आले. त्यानंतर या विभागात एकही कर्मचारी हजर नव्हता. या विभागाला विभाग प्रमुख नाही.भांडारपाल विभागाला कुलूपतिसऱ्या मजल्यावर असलेल्या भांडारपाल विभागाला कुलूप लावल्याचे दिसून आले. हा विभाग कधीच वेळेवर उघडत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मुख्याधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या तक्रारीमुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग हे स्वत: कार्यालयात हजर होते. कार्यालयीन अहवाल तपासणी बरोबरच ते नागरीकांच्या तक्रारी जाणून घेताना दिसून आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी भालसिंग हे जुना बाजार भागात होत असलेल्या मास्टर प्लॅनच्या पाहणीसाठी गेल्याचे पहावयास मिळाले.
अर्धवेळ काम, पूर्ण दिवसाचा दाम !
By admin | Updated: December 28, 2015 23:26 IST