पाटोद्याचा गोकूळ ठरला ‘परळी केसरी’
By Admin | Updated: February 20, 2015 00:10 IST2015-02-19T23:30:06+5:302015-02-20T00:10:10+5:30
परळी : येथील पालिकेतर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत पाटोदा येथील गोकूळ आवारे याने कोल्हापूरच्या संतोष सुतारला लोळवून गुरुवारी परळी केसरी होण्याचा मान मिळविला.

पाटोद्याचा गोकूळ ठरला ‘परळी केसरी’
परळी : येथील पालिकेतर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत पाटोदा येथील गोकूळ आवारे याने कोल्हापूरच्या संतोष सुतारला लोळवून गुरुवारी परळी केसरी होण्याचा मान मिळविला. एक किलो चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
येथील पालिकेतर्फे महाशिवरात्रीनिमित्त यंदा पहिल्यांदाच परळी केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी एक वाजेपासून सुरु झालेल्या स्पर्धा मध्यरात्रीच संपल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे, अर्जून पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, हिंदकेसरी सोळंके (सांगली), महाराष्ट्र केसरी शिवाजी चव्हाण, सईद चाऊस यांची उपस्थिती होती. शेवटची कुस्ती कोल्हापूर येथील संतोष सुतार व पाटोदा येथील गोकूळ आवारे यांच्यात झाली. अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या या स्पर्र्धेत गोकूळने संतोषला लोळवत मैदान मारले. उपविजेत्या संतोषला २५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. अमोल मुंडे, प्रदीप भिसे, राम सोळंके यांनाही गौरविण्यात आले.
नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, वाल्मिक कराड, मुख्याधिकारी डॉ. डी. बी. बिक्कड, दत्तात्रय ढवळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
स्पर्धेमध्ये ७०० हून अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला.
४५०० जण बक्षिसांचे मानकरी ठरले.
४स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्लांनी हजेरी लावली.
४कुस्तीप्रेमींची गर्दी होती.