‘२०१९ पर्यंत धावणार परळी-बीड-नगर रेल्वे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 23:33 IST2017-02-04T23:29:45+5:302017-02-04T23:33:16+5:30
बीड : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली परळी - बीड - नगर रेल्वे येत्या दोन वर्षांमध्ये रूळावर येईल, असे संकेत शनिवारी मिळाले आहेत.

‘२०१९ पर्यंत धावणार परळी-बीड-नगर रेल्वे’
बीड : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली परळी - बीड - नगर रेल्वे येत्या दोन वर्षांमध्ये रूळावर येईल,
असे संकेत शनिवारी मिळाले आहेत.
जिल्ह्याच्या रेल्वेमार्गाला पहिल्यांदाच ७८० कोटी रूपयांची भरीव तरतूद झाली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १५९ कोटी, २०१६ मध्ये ३०० कोटी रूपये मिळाले होते. यावेळी तरतूद झालेल्या ७८० कोटीपैकी ५०० कोटी रूपये वित्तीय संस्थांकडून मिळणार आहेत. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यात २०१९ पर्यंत रेल्वे धावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रश्नी जातीने लक्ष घातले असून, येत्या दोन वर्षामध्ये जिल्हावासियांचे स्वप्न पूर्ण होईल, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)