परळीत दोन जुगार अड्ड्यांवर धाड;१० जेरबंद
By Admin | Updated: February 7, 2017 23:01 IST2017-02-07T22:56:40+5:302017-02-07T23:01:57+5:30
परळी : शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन ठिकाणी जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले

परळीत दोन जुगार अड्ड्यांवर धाड;१० जेरबंद
परळी : शहरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन ठिकाणी जुगारअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी दहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी रात्री आठ वाजता ही कारवाई करण्यात आली.
सिद्धार्थनगर भागातील एका घरासमोर झन्नामन्ना खेळणाऱ्या पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून साहित्य, रोख १०६० व मोबाईल असा २ हजार ६० रुपयांचा ऐवज जप्त केला. रवि वैजीनाथ कदम, प्रदीप दिलीप उगले (दोघे रा. अशोकनगर), अजय यादव तुपसमुद्रे, गोपाळ देवीसिंग खरे (दोघे रा. सिद्धार्थनगर), राहुल बाबूराव पैठणे (रा. फुलेनगर) यांचा आरोपींत समावेश आहे.
दुसरी कारवाईही याच भागात झाली. सिद्धार्थ सुधाकर साळवे, प्रकाश ब्रम्हानंद गायकवाड, प्रकाश वैजीनाथ आचार्य, तुषार भागवत जोगदंड, किशोर अशोक वाव्हळे, राहुल वैजीनाथ आचार्य (सर्व रा. सिद्धार्थनगर) यांचा आरोपींत समावेश आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून २३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदेवाल्यांची पाचावर धारण बसली आहे. (वार्ताहर)