शहरातील उद्याने होताहेत नामशेष..!
By Admin | Updated: August 21, 2015 00:38 IST2015-08-21T00:16:41+5:302015-08-21T00:38:23+5:30
जालना : नागरिकांना क्षणभर विश्रांती तसेच विरंगुळा म्हणून असलेली उद्याने आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोतीबाग वगळता शहरातील दोन छोटी उद्याने भकास झाली आहेत.

शहरातील उद्याने होताहेत नामशेष..!
जालना : नागरिकांना क्षणभर विश्रांती तसेच विरंगुळा म्हणून असलेली उद्याने आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोतीबाग वगळता शहरातील दोन छोटी उद्याने भकास झाली आहेत.
शहरात मोतीबाग, जवाहर बाग, अंबड उड्डाणपूल होण्यापूर्वी तेथे छोटी बाग होती. मोतीबाग वगळता वरील दोन्ही उद्याने भकास झाली.जवाहर बागेत व्यापारी गाळे बांधली आहेत. बागेची पालिकेकडून नियमित देखभाल होत नाही. या बागेत आज अवैध धंदे सुरु असतात. शबीर अली चौकातील बाग पूर्णपणे नष्ट झाली आहे.
काही वसाहतींमध्ये उद्यानांऐवजी वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला खेळण्यास जागा नाही, नागरिकांनाही विरंगुळा म्हणून महामार्गावर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दररोज पाहावयास मिळते. उद्यानांचा विकास करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)