शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अचानक अबोल झालेल्या मुलीला पालकांनी विश्वासात घेतले, ब्लॅकमेलकरून रेप झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:12 IST

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार; एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल

 

वाळूज महानगर : औद्योगिक परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत ओळख वाढवून सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तरुणाने १९ वर्षीय युवतीवर बजाजनगर येथील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी युवतीने एमआयडीसी वाळूज पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार रवी राजू मोरे (रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) याच्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

औद्योगिक परिसरात कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या १९ वर्षीय युवतीसोबत आरोपी रवी मोरे याने ओळख वाढवून तिचा मोबाइल क्रमांक मिळवला. मोबाइल क्रमांक मिळाल्यानंतर दोघेजण तासनतास फोनवर गप्पा मारत होते. दरम्यान, आरोपी हा एकांतात भेटण्यासाठी तिच्याकडे सातत्याने आग्रह करत होता. सप्टेंबर २०२४ मध्ये तिने भेटण्यास होकार दिला. दोघेजण शहरातील एका कॉलेज परिसरात भेटले. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर आरोपीने त्याच्या मोबाइलमध्ये तिच्यासोबत फोटो काढले.

धमकावून भेटण्यासाठी बोलावलेपहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी आरोपीने त्या युवतीकडे पुन्हा भेटण्याचा आग्रह धरला. मुलगी भेटण्यास तयार होत नसल्याने आरोपीने तिला धमकावत ‘तू मला हॉटेलवर भेट, नाही तर मी काढलेले फोटो तुझ्या आईवडिलांना दाखवितो,’ असे धमकावले. घाबरलेल्या मुलीने घरी कॉलेजला जाते असे सांगून बाहेर पडली. आरोपी त्याच्या दुचाकीवरून मुलीला बजाजनगर, महाराणा प्रताप चौकातील एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही, तर स्वत:च्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर त्याने तिला शहरातील तिच्या कॉलेज परिसरात सोडले.

पालकांनी विश्वासात घेतल्याने प्रकार उघडकीसआरोपी रवी मुलीला वारंवार त्याच्या मोबाइलमधील आक्षेपार्ह फोटो घरच्यांना दाखवण्याची धमकी देत, मुलीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडत असल्याने मुलीच्या मनावर परिणाम झाला होता. मुलगी अचानक शांत राहत असल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, मुलीने दिलेल्या माहितीनंतर पालकांना धक्का बसला. पालकांनी मुलीसह एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी