‘लोकमत’ अ‍ॅस्पायरला पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: June 5, 2016 00:38 IST2016-06-05T00:21:35+5:302016-06-05T00:38:03+5:30

लातूर : ^‘लोकमत’ च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ या उपक्रमाला शहरासह

Parents, students' spontaneous response to 'Lokmat' Aspire | ‘लोकमत’ अ‍ॅस्पायरला पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकमत’ अ‍ॅस्पायरला पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


लातूर : ^‘लोकमत’ च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ या उपक्रमाला शहरासह जिल्हाभरातील पालक-विद्यार्थी आणि नामवंत शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञांनी भेट देवून पाहणी केली आहे. लातुरात लोकमत ने अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ मुळे एकाच छताखाली राज्यासह देशभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांची, कोर्सची आणि तेथे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना मिळत आहे. ३ ते ५ जून या कालावधीत हे शैक्षिणक प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनाला शनिवारी पालक, विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली.
राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, लातूर, उदगीर, भालकी, अहमदपूर, सातारा, नाशिक आदीं शहरातील नामवंत संस्थांनी आपले शैक्षणिक स्टॉल थाटले आहेत. या स्टॉलवर दहावी आणि बारावीनंतर काय शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत? त्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत गत शुक्रवारपासून स्टॉलवरील कर्मचारी माहिती देत आहेत. विशेष म्हणजे, उच्च शिक्षणासाठी शेकडोंच्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याची माहिती पालकांना मिळत आहे. पुणे आणि मुंबई, ठाणे या महानगरातून जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून हे कोर्सेस आणि पदव्या आपल्याला मिळविता येतात. याबाबतची सर्व शैक्षणिक माहिती आपल्याला लोकमतने एकाच छताखाली उपलब्ध करुन दिली आहे. शनिवारी पालक, विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सोहळ््याला मोठ्या प्रमाणावर दिवसभर गर्दी केली होती. सायंकाळी परिसंवाद, चर्चासत्र आणि शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली आहे.

Web Title: Parents, students' spontaneous response to 'Lokmat' Aspire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.