शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारातील तांदळात लेंड्या, अळ्या निघाल्याने पालकांचा राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 13:12 IST

सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक जि. प. शाळेतील प्रकार

सिल्लोड : तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहाराच्या तांदळाची शुक्रवारी सकाळी ११ वाजता ग्रामस्थांनी पाहणी केली. त्यात अळ्या व उंदराच्या लेंड्या आढळल्यामुळे पालकांनी चांगलाच राडा केला.

वांगी बुद्रुक येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून त्यात १३३ विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने या कार्यक्रमासाठी सरपंच बापूराव काकडे व पालक शाळेत उपस्थित होते. जयंती साजरी करताना पोषण आहार घेऊन ठेकेदारांची गाडी आली. व त्यांनी पोषण आहाराचा दहा कट्टे तांदूळ शाळेच्या खोलीत टाकला. यावेळी तेथे असलेल्या सरपंच बापू काकडे, पालक माधवराव तायडे, प्रकाश काकडे, ईश्वर काकडे, गजानन काकडे, लतीफ शहा, गणेश काकडे यांनी तेथे जाऊन त्या तांदळांची तपासणी केली. तेव्हा त्यात चक्क अळ्या व उंदरांच्या लेंड्या दिसल्या. त्यांनी याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी राजू फुसे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या निकृष्ट आहारामुळे जर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर याला कोण जबाबदार राहील, असे मत यावेळी पालकांनी व्यक्त केले.

आहार बदलून देऊसदर पोषण आहार हा ठेकेदार पुरवठा करतो. याच्याशी आमचा संबंध नसतो. शुक्रवारी वांगी बु. येथे पुरवठा झालेल्या तांदळात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्याची तक्रार आली आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला कळवले असून त्याने आहार बदलून देतो, असे सांगितले आहे. तो आहार वापरू नये, अशा सूचना शिक्षकांना दिल्या आहेत.

मुलांच्या जिवाशी खेळ...हल्ली शाळांना पुरवठा केला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा येत आहे. काही दिवसांपूर्वी धोत्रा येथील पोषण आहारात तर चक्क मेलेला उंदीर निघाला होता. वांगी बु. येथील आहारात अळ्या व उंदराच्या लेंड्या निघाल्या. हा तर विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही करावी.- बापूराव काकडे, सरपंच, वांगी बुद्रुक

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीfoodअन्नAurangabadऔरंगाबाद