शाळेकडून होणाऱ्या सक्तीचा पालकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:56+5:302021-07-09T04:05:56+5:30
औरंगाबाद : राखून ठेवलेले निकाल आणि स्वयंप्रकाशित पुस्तकांच्या खरेदीच्या सक्ती विरोधात गुरुवारी पालकांनी युनिव्हर्सल हायस्कूलसमोर निषेध नोंदवला. शाळा प्रशासनासोबत ...

शाळेकडून होणाऱ्या सक्तीचा पालकांकडून निषेध
औरंगाबाद : राखून ठेवलेले निकाल आणि स्वयंप्रकाशित पुस्तकांच्या खरेदीच्या सक्ती विरोधात गुरुवारी पालकांनी युनिव्हर्सल हायस्कूलसमोर निषेध नोंदवला. शाळा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत पुढील सात दिवसात दिलासा न दिल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, युनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्यांसोबत पालकांची बैठक गुरुवारी पार पडली. त्यात पालकांनी शाळेने राखून ठेवलेले प्रगती पुस्तक द्यावे. पुस्तके व स्टेशनरी खरेदीची सक्ती करु नये. तसेच १५ जुलैपासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु होत असल्याने पालकांवर अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदीला दबाव आणू नये, अशी मागणी केली. दरम्यान, पालकांनी हाती फलक घेऊन शाळेसमोर निषेध नोंदवला. पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांच्या पत्राची दखल न घेणाऱ्या शाळेवर कारवाईची मागणी केली. यावेळी राजीव जावळीकर, प्रवीण जैस्वाल यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. या विषयी शाळेच्या प्राचार्या सीमा गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.