क्रॅश कोर्समध्ये पालकांनी मुलांना गुंतविले
By Admin | Updated: May 15, 2015 00:50 IST2015-05-15T00:42:06+5:302015-05-15T00:50:15+5:30
लातूर : मामाच्या गावाला जाणे आणि खेळात रमणे आता कमी झाले आहे़ संगणक आणि टीव्हीवर कार्टुन पाहण्यात मुले रमत आहेत़

क्रॅश कोर्समध्ये पालकांनी मुलांना गुंतविले
लातूर : मामाच्या गावाला जाणे आणि खेळात रमणे आता कमी झाले आहे़ संगणक आणि टीव्हीवर कार्टुन पाहण्यात मुले रमत आहेत़ उन्हाळी सुट्ट्या असूनही मुलांना पालकांनी क्रॅश कोर्समध्ये बांधून ठेवले आहे़ १० वी व १२ वीच्या मुलांचे उन्हाळी वर्ग चालूच आहेत़ पण ४ थी ते ८ वी पर्यंतच्या मुलांनाही क्रॅश कोर्समध्ये गुंतविले आहे़ ६५ टक्के मुलांना उन्हाळी सुट्ट्यात कसलाही कोर्स नको आहे़ सुट्ट्याचा मनसोक्त आनंद घेऊ द्यावा, हे मुलांचे म्हणणे ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून समोर आले आहे़
४ थी ते ८ वी पर्यंतच्या मुला-मुलींचा सुट्ट्या विषयी सर्व्हेक्षणाद्वारे कानोसा घेतला असता, शहरातील बहुतांश मुला-मुलींना वेगवेगळे कोर्स लावण्यात आले आहेत़ संगणक, स्पोकन क्लास व अन्य क्रॅश कोर्स लावण्यात आले आहेत़ त्यामुळे त्यांना मनसोक्तपणे सुट्ट्यांचा आनंद लुटता येत नाही़ सर्व्हेक्षणातील १०० पैकी ६५ मुला-मुलींनी सुट्ट्यांमध्ये कोर्स नको, टीव्हीवर कार्टुन पाहण्यास मुभा मिळावी, असे मत नोंदविले आहे़ क्रॅश कोर्सहून आल्यानंतर मिळालेल्या वेळेत मुलं कार्टुनचा आनंद लुटतात़
फावल्या वेळेत कार्टुन पाहताना पालकांकडून विरोध होतो़ कार्टुनचे चॅनल लावण्याऐवजी रॅम्स चॅनल लावण्याची सूचना पालकांकडून होते़ रॅम्समधील पोयम, स्टोरी आम्ही शाळेत शिकली़ त्या पोयम व स्टोरी आम्हाला पाठ आहेत़ तरी पप्पांकडून रॅम्स चॅनल पाहण्याचा आग्रह होतो़ पोगो लावू दिला जात नाही, अशी तक्रारही मुलांनी केली़
४सुट्ट्या लागल्यानंतर ५४ टक्के मुला-मुलींच्या आई-बाबांनी क्रॅश कोर्स लावल्याचे नियोजन केल्याचेही सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले़ केवळ २६ टक्के मुलांच्या पालकांनी सुट्ट्याचा मुक्तपणे आनंद लुटू देण्यास हरकत घेतली नाही़ त्यामुळे ६५ टक्के मुलांनी कोर्समुळे व आई-बाबांच्या आग्रहामुळे आम्हाला सुट्टीचा आनंद लुटता येत नसल्याचेही गाऱ्हाणे मांडले़
४५ वीच्या पुढील ५२ टक्के मुलांनी सुट्टी घालविण्यासाठी स्वत:चे मत तयार केले होते़ मात्र पालकांमुळे नियोजनाप्रमाणे सुट्टीचा आनंद घेता येत नसल्याचेही मत नोंदविले आहे़ क्रॅश कोर्सला जाताना कंटाळा येतो, अशी नाराजी व्यक्त केली़