परभणीत सव्वादोन लाखांची घरफोडी
By Admin | Updated: May 26, 2014 00:57 IST2014-05-26T00:48:08+5:302014-05-26T00:57:56+5:30
परभणी : शहरातील दत्तनगरात सव्वादोन लाखांची घरफोडी झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परभणीत सव्वादोन लाखांची घरफोडी
परभणी : शहरातील दत्तनगरात सव्वादोन लाखांची घरफोडी झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २४ मे रोजी दत्तनगरातील रहिवासी रवीशंकर रामराव शेळके यांचे कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले असता पहाटे दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमच्या खिडकीचे ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. खालच्या खोलीमध्ये असलेल्या शेळके यांच्या आजीला चाकूचा धाक दाखवून रोख ३५ हजार रुपये व ७२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, कर्णफूल, अंगठ्या, दोन मोबाईल असा एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला. घटनेनंतर रवीशंकर शेळके यांनी तत्काळ नानलपेठ पोलिसांना दूरध्वनी करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)या घटनेबाबत तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाने दत्त मंदिर परिसरापर्यंत माग काढला. नानलपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास किशोर तरोणे हे करीत आहेत. मागील काही दिवसांपासून परभणी शहरात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वार्डात व गल्लीत रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने होत आहे.