परभणीचा पारा ४३ अंशावर
By Admin | Updated: April 18, 2016 00:49 IST2016-04-18T00:46:21+5:302016-04-18T00:49:19+5:30
परभणी : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून, त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवनावर होत आहे़ रविवारी जिल्ह्याचे तापमान ४३ अंश एवढे नोंद झाले़

परभणीचा पारा ४३ अंशावर
परभणी : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असून, त्याचा परिणाम दैनंदिन जनजीवनावर होत आहे़ रविवारी जिल्ह्याचे तापमान ४३ अंश एवढे नोंद झाले़
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशावर पोहोचला होता़ तेव्हापासून काही दिवसांचा अपवाद वगळता जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या खाली उतरले नाही़ दररोज कडक ऊन आणि उन्हामुळे होणारा उकाडा नागरिकांना असह्य करून सोडत आहे़ उन्हाचे चटके सकाळी १० वाजेपासूनच बसू लागले आहेत़ सूर्य माथ्यावर आल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत असून, दुपारी ४ वाजेपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे़ घरोघरी कुलर लावून उन्हापासून बचाव केला जात आहे़ नागरिकांनीही आता उन्हाची धास्ती घेतली असून, घराबाहेर पडून करावी लागणारी बहुतांश कामे सकाळीच किंवा सायंकाळच्या वेळी केली जात आहेत़ (प्रतिनिधी)