परभणीत स्वंतत्र नेत्र रुग्णालय होणार
By Admin | Updated: August 12, 2014 02:00 IST2014-08-12T01:28:21+5:302014-08-12T02:00:19+5:30
परभणी : येथील शनिवार बाजारात स्त्री रुग्णालयासाठी बांधलेल्या इमारतीत आता नेत्र रुग्णालय सुरू होणार आहे. ४० खाटांच्या या नेत्ररुग्णालयाचे लवकरच लोकार्पण होईल.

परभणीत स्वंतत्र नेत्र रुग्णालय होणार
परभणी : येथील शनिवार बाजारात स्त्री रुग्णालयासाठी बांधलेल्या इमारतीत आता नेत्र रुग्णालय सुरू होणार आहे. ४० खाटांच्या या नेत्ररुग्णालयाचे लवकरच लोकार्पण होईल.
स्वतंत्र स्त्री रुग्णालयासाठी येथील शनिवार बाजारात इमारत बांधण्यात आली होती; परंतु यासाठी आवश्यक ती परवानगी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे वर्षभरापासून ही इमारत पडून होती. दरम्यान शनिवार बाजारातील या इमारतीला बांधकाम परवाना आणि रुग्णालय कार्यान्वित करण्याची परवानगी नुकतीच प्राप्त झाली आहे. ही इमारत स्त्री रुग्णालयासाठी प्रस्तावित होती, परंतु रुग्णालय सेवेचा दर्जा वाढल्याने रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी ही जागा अपुरी पडत असल्याने ४० खाटांचे नेत्र रुग्णालय या ठिकाणी कार्यान्वित करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे.
परभणी येथील जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांवर ५० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला. राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे. (प्रतिनिधी)