परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले

By Admin | Updated: June 23, 2017 23:35 IST2017-06-23T23:31:51+5:302017-06-23T23:35:21+5:30

परभणी : राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेचा निकाल २३ जून रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

Parbhani students shine brightly in the examination | परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले

परभणीचे विद्यार्थी नीट परीक्षेत चमकले

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षेचा निकाल २३ जून रोजी जाहीर झाला असून या परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. येथील व्यंकटेश काळे या विद्यार्थ्यास ७२० पैकी ६१८ गुण मिळाले आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यावर्षी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता परीक्षा (नीट) घेण्यात आली. एकूण ७२० गुणांच्या या परीक्षेत जीवशास्त्र विषयाची ३६०, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयाची १८० गुणांची परीक्षा घेण्यात आली. नकारात्मक गुण पद्धतीनुसार झालेल्या या परीक्षेमुळे नीटच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणीतील व्यंकटेश काळे या विद्यार्थ्यास सर्वाधिक ६१८ गुण मिळाले आहेत. त्याच प्रमाणे संकेत गडम- ५७८, ईश्वरी औंढेकर- ५७०, व्यंकटेश कोट्टावार- ५५८, अनिकेत व्यवहारे- ५४७, फोरम मनिष उपाध्याय- ५४६, रुपाली शेळके ५४४, सौरभ नखाते- ५४०, शेख अफताब- ५३४, गणेश सारडा- ५२६, अर्जून रेंगे ५२५, आजम इनामदार-५१६, ऋतिका पोकळे - ५१३, शीतल मोरे- ४९४, अमना नबीला- ४८३, आकाश बल्लाळ- ४८२, सूरज कऱ्हाळे- ४८१, सचिन कऱ्हाळे- ४८०, दत्ता मीठे- ४६३, असफिया अरम-४६४, ऋतुजा ढगे- ४५७, अभय इमडे- ४५० या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्याच परीक्षेत परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Parbhani students shine brightly in the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.