परभणीत आंदोलनांनी गाजला शनिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:59 IST2017-09-16T23:59:43+5:302017-09-16T23:59:43+5:30
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी शहरात विविध मागण्यांसाठी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकाºयांनी आंदोलने केली़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची दिवसभर रेलचेल दिसून आली़ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न घेऊन विविध सामाजिक संघटनांनी हे आंदोलन केले़ या आंदोलनांचा आढावा़़़़

परभणीत आंदोलनांनी गाजला शनिवार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर १६ सप्टेंबर रोजी शहरात विविध मागण्यांसाठी सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पदाधिकाºयांनी आंदोलने केली़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांची दिवसभर रेलचेल दिसून आली़ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रखडलेले प्रश्न घेऊन विविध सामाजिक संघटनांनी हे आंदोलन केले़ या आंदोलनांचा आढावा़़़़
महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीवर कर्मचाºयांवर तात्काळ कार्यमुक्त करावे, या प्रमुख मागणीसाठी भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़
भटक्या विमुक्त वडार समाजातील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र विना अट देण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे, शौचालयाच्या अनुदानाची रक्कम अदा करावी, प्रलंबित शौचालयाच्या अर्जास तत्काळ मंजुरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी शनिवारी भटक्या विमुक्त आघाडी व मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे़
उपोषणात सुभाष गुजर, नरसिंग मुधळकर, गंगाधर चव्हाण, तुळशीराम जाधव, हनुमान पवार, सुनील धोत्रे, विशाल सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, किशन टाक, सतीश गाडेकर, सुनील गाडेकर, दीपक गुजर, येलप्पा देवकर, मनोहर जाधव आदींनी सहभाग घेतला आहे.
परभणी : परभणी ते गंगाखेड रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी पोखर्णी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला होता़
सकाळी १० वाजेपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला़ आंदोलनासाठी ग्रामीण भागातून अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ येणार होते़ परंतु, पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावर येऊ दिले नाही, असा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे़ प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, कॉ़लक्ष्मण काळे, सुरेश इखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के़एच़ सोनवणे, खंडेलवाल हे आंदोलनस्थळी उपस्थित झाले़ परभणी-गंगाखेड रस्त्यावरील खड्डे १७ नोव्हेंबरपूर्वी बुजविण्यात येतील, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम सुरू करू, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले़
आंदोलनानंतर निवेदन देण्यात आले़ जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, लक्ष्मण काळे, सुरेश इखे, ओंकार पवार, उपजिल्हाप्रमुख रोहिदास बोबडे, नंदकुमार जामकर, गजानन चोपडे, त्र्यंबक शेळके, गजानन जाधव, शंकर देवकते, मुकूंद कच्छवे, सुंदर खोड आदींसह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते़ भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही या आंदोलनाला पाठींबा दिला़