परभणी बसस्थानकातील बेवारस बॅगने उडाली खळबळ
By Admin | Updated: February 22, 2016 00:01 IST2016-02-21T23:59:08+5:302016-02-22T00:01:46+5:30
परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली.

परभणी बसस्थानकातील बेवारस बॅगने उडाली खळबळ
परभणी : शहरातील बसस्थानकातील चौकशी कक्षा जवळील प्लॅटफॉर्मवर बेवारस बॅग असल्याचा फोन एका प्रवाशाने जिल्हा नियंत्रण कक्षात केला़ त्यानंतर बीडीडीएस पथकाने घटनास्थळी पोहचून बॅगची पाहणी केली. ६.३० ते ७ च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने बसस्थानक परिसरात प्रवाशांची धावपळ झाली.
पथकाच्या पाहणीमध्ये दोन बॅग या परिसरात आढळल्या़ प्रवाशांना बाजुला सारून या बेवारस बॅग स्थानकाच्या बाहेर मोकळ्या जागेत तपासल्या़ हा सर्व प्रकार २१ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६़३० ते ७ च्या दरम्यान घडला़ बेवारस बॅग सापडल्याने बसस्थानक एकच खळबळ उडाली होती़ बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक आऱएस़ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक कुलकर्णी, एस़ बी़ मोहळे, शिवाजी काळे, शिराळकर, रासकटला, महारुद्र सपकाळ, कोतवालीचे एस़ एऩ गुट्टे, बी़ एस़ घांडगे व आऱ एम़ खंदारे यांनी सर्वत्र पाहणी करून बेवारस बॅग बाहेर काढल्या़ डॉग हँडलर अय्युब शेख यांनी डॉग जंजीरच्या सहाय्याने कसून तपासणी केली़ (प्रतिनिधी)