परभणीत भिकाऱ्यांचा सर्व्हे

By Admin | Updated: August 27, 2014 23:45 IST2014-08-27T23:42:42+5:302014-08-27T23:45:43+5:30

परभणी : शहरातील भीक मागणाऱ्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करण्यासाठी समाजकार्य प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सर्व्हे करण्यात आला़

Parbhani beggars surveys | परभणीत भिकाऱ्यांचा सर्व्हे

परभणीत भिकाऱ्यांचा सर्व्हे

परभणी : शहरातील भीक मागणाऱ्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करण्यासाठी समाजकार्य प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच सर्व्हे करण्यात आला़
रेल्वे स्थानक, बसस्थानक, तुराबूल हक दर्गा परिसर, पारदेश्वर मंदिर परिसर, बेलेश्वर मंदिर परिसर, दत्तधाम, उघडा महादेव मंदिर परिसर, शनि मंदिर परिसर, यासह शहरातील विविध भागांना भेटी देऊन प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सर्वेक्षण केले़ सामाजिक संशोधन पद्धतीच्या नमुना निवड या पद्धतीचा वापर सर्व्हेक्षणासाठी करण्यात आला़ भीक मागणाऱ्या लोकांचे आरोग्य, निवारा, सामाजिक, आर्थिक समस्या या सर्वेक्षणातून जाणून घेण्यात आल्या़ समाजकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा़ प्रवीण कनकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे स्वयंसेवक नरेंद्र खंदारे, राहुल खंदारे, राहुल शेळके, योगेश सौंदरमल, स्वाती कनकुटे आदींनी हे सर्व्हेक्षण केले़ यानंतर उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे विविध समस्या सोडविण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला जाणार असल्याचे प्रा़ प्रवीण कनकुटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Parbhani beggars surveys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.