परशुराम जयंती उत्साहात
By Admin | Updated: April 29, 2017 00:42 IST2017-04-29T00:38:50+5:302017-04-29T00:42:33+5:30
लातूर : परशुराम जयंती उत्सव समिती व विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

परशुराम जयंती उत्साहात
लातूर : परशुराम जयंती उत्सव समिती व विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
गोपूजन करून पेठ येथील गोरक्षणात गाईंसाठी एक ट्रक कडबा देण्यात आला. उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, पापासेठ ताथोडे, संजय अयाचित, प्रसाद उदगीरकर आदींची यावेळी उपस्थिती होती. पेठ येथील शांतीर गुरुपदप्पा धरणे या अल्पभूधारक शेतकऱ्याचा सत्कारही जयंतीनिमित्त करण्यात आला. (प्रतिनिधी)