औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला समांतर जलवाहिनी योजना राबविण्यासाठी दहा वर्षांपूर्वी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. व्याजापोटी १२७ कोटी ९ लाख रुपये जमा झाले आहेत. मनपाच्या तिजोरीत २८८ कोटी रुपये पडून आहेत. तरीही जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत एक थेंबही पाणी युतीच्या पदाधिकाऱ्यांना आणता आले नाही. उलट मंगळवारी अचानक योजनेचे नाव बदलण्याचा पराक्रम करण्यात आला. यासंदर्भात सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नमूद केले की, अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले. आता नवीन गंगा-गोदावरी पेयजल योजना असे नाव देण्यात आले. औरंगाबादचा आणि गंगेचा काय संबंध आहे. गंगा पवित्र मानण्यात येते. त्याला कशासाठी बदनाम करताय? स्वार्थासाठी नाव बदलण्याचा हा सर्व खटाटोप आहे.सेनेसोबत नाव जोडल्या गेले...समांतर योजनेचे नाव सेनेसोबत जोडल्या गेले आहे. या योजनेमुळे शिवसेना प्रचंड बदनाम झाली आहे. त्यांना हे नावच नको आहे. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार करण्यात आला आहे. नाव बदलले तर सर्व काही धुतल्या जाईल, असे सेना नेत्यांना वाटत आहे. हे कदापि शक्य नाही. स्वार्थासाठी हा खटाटोप सुरू आहे. गंगा पवित्र आहे, असे म्हटले जाते. हे पवित्र नाव तरी बदनाम योजनेत घ्यायला नको होते. नाव बदलल्याने सेनेचा हेतू साध्य होणार नाही.इम्तियाज जलील, आमदारनाव काय बदलता, पाणी द्या...मागील एक दशकापासून शहरातील नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. त्यांची तहान भागविणे युतीचे आद्य कर्तव्य आहे. जायकवाडीहून नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनीही युतीला टाकता आली नाही. ४ महिन्यांपासून समांतरचा ठराव मंजूर करून ठेवला आहे. पुढे निर्णयच होत नाही. नाव बदलण्यापेक्षा सर्वसामान्यांची तहान भागवावी.भाऊसाहेब जगताप, गटनेता काँग्रेसजनता तहानलेली असताना...शहरातील जनता तहानलेली असताना समांतर जलवाहिनीचे नाव बदलण्यात आले. नाव काहीही ठेवा, पण नागरिकांना पाणी तर द्या. आजच्या परिस्थितीत योजना पूर्ण होणे खूप गरजेचे आहे. दहा वर्षांपासून योजना पूर्ण होत नाही. मागील वर्षभरात पदाधिकाºयांनी नाव का बदलले नाही. आताच हा आविष्कार का झाला. योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप
स्वार्थासाठी समांतरचे नाव बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:14 IST
शहरातील १५ लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या समांतर जलवाहिनीचे नाव मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी बदलले. ‘गंगा-गोदावरी पेयजल योजना’ असे नाव देण्यात आले. यावर आज सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीच महापौरांना घरचा आहेर देत स्वार्थासाठी नाव बदलण्यात आले. अगोदर समांतरला बदनाम करण्यात आले, आता गंगा बदनाम करताय का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
स्वार्थासाठी समांतरचे नाव बदलले
ठळक मुद्देशिवसेना : महापौरांना जिल्हाप्रमुखांकडून घरचा आहेर