परळी आडत बाजारपेठ चार दिवसांपासून बंद

By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-08T22:40:32+5:302014-07-09T00:27:04+5:30

परळी: येथील आडस बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोमवारपासून या बाजारपेठेत खरेदी-विक्री ठप्प आहे.

Parali closing market closed for four days | परळी आडत बाजारपेठ चार दिवसांपासून बंद

परळी आडत बाजारपेठ चार दिवसांपासून बंद

परळी: येथील आडस बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने कोटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सोमवारपासून या बाजारपेठेत खरेदी-विक्री ठप्प आहे.
येथील आडत बाजारपेठ मागील गुरुवारपासून बंद आहे. सोमवारीही खरेदी-विक्री आडत बाजारात झाली नाही. धान्यांचे बीट निघालेच नाही. त्यामुळे दररोज कोटीच्यावर होणारी धान्यांची होणारी खरेदी-विक्री ठप्प झाली आहे. सोमवारी बीडच्या सहकारी संस्थांचे जिल्हा निबंधक वांगे यांनी परळी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात काही व्यापाऱ्यांची बैठक घेतली व त्यांच्याशी चर्चा केली.
३० जून रोजी परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती वंदना पवार व आडत व्यापारी श्रीधरराव मुंडे यांच्यात वाद झाला होता. श्रीधरराव मुंडे यांच्या विरोधात १ जुलै रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्रीधरराव मुंडे यांच्याविरुद्ध अन्यायकारक कारवाई केल्याच्या निषेधार्थ ३ जुलैपासून आडत व्यापाऱ्यांनी आडत व्यवहार बंद ठेवला आहे. सोमवारीही आडत बाजारपेठ उघडली नव्हती, त्यामुळे खरेदीदारांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. सोमवारी बाजार समितीच्या सचिव वंदना पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
खरेदीदारांचे हाल
या आडत बाजारात परळी तालुक्यातील खेडेगावातील नागरिक विविध धान्य खरेदी-विक्रीसाठी येत असतात. ही बाजारपेठ मागील चार दिवसांपासून बंद असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. व्यापारी मात्र आडत बाजार सुरू करण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे.
व्यापारी व कृउबा सचिवाचा वाद
३० जून रोजी बाजार समितीच्या सचिव वंदना पवार व आडत व्यापारी श्रीधरराव मुंडे यांच्यात वाद झाला होता. हा वाद झाल्यानंतर पवार यांनी मुंडे यांच्या विरोधात शहर ठाण्यात तक्रार दिली होती. व्यापारी मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला याच्या निषेधार्थ येथील बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी आडत बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला. बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.
(वार्ताहर)
गुरुवारपासून बाजारपेठ ठेवण्यात आली बंद
चार दिवस उलटूनही बाजारपेठ सुरू करण्यास व्यापारी पुढे येईनात
खरेदीदारांची होतेय गैरसोय
बाजार समिती सचिव वंदना पवार, आडत व्यापारी, श्रीधरराव मुंडे यांच्यात ३० जून रोजी झाला होता वाद
पवार यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Parali closing market closed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.