पोलीस बंदोबस्तात तूर खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:01 IST2017-07-28T00:01:42+5:302017-07-28T00:01:42+5:30
हिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.

पोलीस बंदोबस्तात तूर खरेदी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शासनाने पुन्हा तूर खरेदीचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात सकाळी सहा वाजेपासून तूर खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. मात्र टोकन दिलेल्या व कागदपत्रे तपासून घेतलेल्या १८४ शेतकºयांचीच तूर घेतली जाणार असून नोंदणी केलेल्या ४८८५ शेतकºयांचा प्रश्न लटकलेला आहे.
मागील सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तूर प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा काही निघाला नाही. वारंवार मिळणारी मुदतवाढ, बंद पडणारे केंद्र यातच वेळ जास्त वाया गेला. त्यातही व्यापाºयांनी घुसखोरी करून आपली कमी भावात घेतलेली तूर विकून चांदी करून घेतली. शेतकरी मात्र रांगेतच राहिले. प्रतीक्षेत रात्रंदिवस मोंढ्यात काढले. मात्र त्यांचा काही क्रमांक लागला नाही. काही शेतकºयांनाच हा त्रास झाला. अनेक शेतकºयांची तूर या केंद्रावर विकलीही गेली. नंतर खरेदी केंद्र बंद पडले. काही केंद्रांवर तूर सडली. पुन्हा आदेश आले तर त्यात इतक्या किचकट अटी आहेत की, शेतकºयांच्या घरापर्यंत जावून तपासणी करता येणार आहे. शिवाय टोकन असेलल्यांचीच तूर खरेदी होत आहे. तुरीचा ओलावा तपासला जात आहे.
तहसीलदारांनी हिंगोली केंद्रावर १८८ शेतकºयांच्या कागदपत्राची तपासणी करुन त्यांची तूर खरेदी करण्याच्या सूचना खरेदी विक्री संघाला दिल्या होत्या. मात्र यातील चार शेतकºयांना पैशाची गरज असल्याने त्यांनी मिळेल त्या दरात तुरीची विक्री केली. नोंदणी केलेल्या काही शेतकºयांना नोंदणीचा एसएमएस आला. परंतु यादीत नावेच दिसत नसल्याने शेतकरी पुन्हा हैराण आहेत. गुरुवारी जिल्हा उपनिबंधकांनी तूर खरेदीचा आढावा घेतला. अजूनही व्यापाºयाचीच तूर खरेदी होत असल्याची शंका काही शेतकरी व्यक्त करीत आहेत. पुन्हा सुरु केलेल्या तूर खरेदीचा फायदा व्यापाºयांना न होता शेतकºयांना व्हावा. यासाठी शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी बारकाईने होणे गरजेचे आहे.
पहिल्याच दिवशी तब्बल ४५ शेतकºयांची ८३६. ५० क्विंटल तुरीची खरेदी केली. आता १३९ शेतकºयांची तूर खरेदी बाकी आहे. जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसात तीही खरेदी होणार असल्याचा अंदाच खरेदी विक्री संघातर्फे सांगितला.