शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा-धनंजय मुंडे ११ वर्षांनंतर एकत्र; गोपीनाथगडावर भावनिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:36 IST

"गोपीनाथ मुंडे आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"; पंकजा मुंडेंचे भावनिक भाषण

परळी (जि. बीड): भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील ‘लोकनेते’ गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त परळी येथील गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले. विशेषतः मुंडे कुटुंबातील दोन महत्वाचे चेहरे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे तब्बल ११ वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनास एकत्र मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही हजेरी लावल्याने एक भावनिक क्षण अनुभवण्यास मिळाला. कार्यक्रमाच्या शेवटी बहीण-भाऊ ताटालाताट लावून जेवण करत होते.  हे चित्र पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य, आनंद व आशेचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या, "धनंजय यांनी मला सांगितले, ‘आमच्यावतीने तूच बोल’, म्हणून आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "मी एकटी नाही, माझ्या पाठीशी तुम्ही सगळे उभे आहात. ही एक कुटुंब व्यवस्था आहे. दरवर्षी आम्ही कार्यक्रम करतो, पण प्रत्येक वेळी वाटतं की आणखी काहीतरी करावं." रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा सामाजिक उपक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडेंचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. "त्यांना जर रक्त लागलं असतं, तर आपण कमी पडलो नसतो. म्हणूनच आजही आम्ही लोकांसाठी रक्तदान करत आहोत," असे त्यांनी सांगितले.

"ते आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते"आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या कार्याचा पुनःस्मरण करत त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला. "मुंडे साहेब आज असते, तर देशाच्या मोठ्या पदावर असते, त्यांनी फार मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांची धडपड होती," असे त्यांनी स्पष्ट केले. "तुम्ही त्यांना शोधता कुठे, मला माहीत नाही; पण मी त्यांना तुमच्यामध्ये शोधते," अशा शब्दांत त्यांनी उपस्थित जनतेशी आत्मीयतेने संवाद साधला.

पंकजा-धनंजय एकत्र जेवणतसेच बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पांडवांना आणि रामाला देखील वनवास सहन करावा लागला होता, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे कीर्तनात ऐकले, असंही पुढे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पंकजा मुंडे यांनी उपस्थित सर्व लोकांना "दोन घास खाऊनच जा" असे सांगून जेवणासाठी आग्रह केला. विशेष म्हणजे, यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकाच पंगतीत एकत्र जेवण केले. हा प्रसंग अनेक कार्यकर्त्यांना भावूक करणारा होता. 

धनंजय मुंडे मात्र मुकचराज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र, त्यांनी भाषण न करता मौन राखले. मागील काही दिवसांपासून मुंडे हे निकटवर्तीय वाल्मीक कराडमुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. नुकतेच ते विपश्यना केंद्रात ध्यानधारणेसाठी जाऊन आले आहेत. त्यानंतर प्रथमच ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे त्यांच्या या संयमित भूमिकेवरही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBeedबीड