रस्त्यावर फेकलेल्या गादीची नागरिकांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:05 AM2021-05-16T04:05:36+5:302021-05-16T04:05:36+5:30

शनिवारी सकाळी जेव्हा वाहनधारक व्होखार्ट कंपनीकडून जळगाव रोडने आंबेडकर नगरकडे जात होते. त्यांना दुभाजकाला खेटून एक फाटकी गादी फेकून ...

Panic among the citizens of the mattress thrown on the road | रस्त्यावर फेकलेल्या गादीची नागरिकांत दहशत

रस्त्यावर फेकलेल्या गादीची नागरिकांत दहशत

googlenewsNext

शनिवारी सकाळी जेव्हा वाहनधारक व्होखार्ट कंपनीकडून जळगाव रोडने आंबेडकर नगरकडे जात होते. त्यांना दुभाजकाला खेटून एक फाटकी गादी फेकून दिल्याचे आढळले. एका चालकाने तर ट्रक थोडा मागे घेत गादीच्या थोडे बाजूने ट्रक पुढे नेला. त्या गादीवरून ट्रकचे चाक गेले असते तर कोरोनाचे विषाणू टायरला चिटकले असते व ते चालकापर्यंत आले असते, असे चालक हरिसिंग याने सांगितले.

दुपारी समोरील कॉलनीतून काही महिला स्वच्छता कर्मचारी चालल्या होत्या. त्यांना काही जणांनीही गादी उचलून कचरा गाडीत टाकण्याची विनंती केली. मात्र, कोरोनामुळे मृत्यून झालेल्या एखाद्या रुग्णाचीही गादी असू शकते, असा संशय घेत त्या महिला पुढे निघून गेल्या. ही गादी कोणी आणून टाकली, ती कोरोना रुग्णाची होती का हे प्रश्न अनुत्तरित राहिले.

चौकट

संशयवृत्ती वाढली

कोरोनामुळे लोकांमध्ये संशयवृत्ती वाढली आहे. यामुळे कुठेही हात लावताना अनेकजण दहावेळा विचार करीत आहेत. रस्त्यावरील त्या फेकून दिलेल्या गादीबद्दल लोकांनी सावधगिरी बाळगत तिला स्पर्श केला नाही, हे योग्यच होते. पण, अशा प्रकारे गादी तेही कोरोनाचा संसर्ग काळात रस्त्यावर टाकणे हे अयोग्य असून अशी कृती करणाऱ्याला अटक करावी, असे मत मानसोपचारतज्ञांनी व्यक्त केले.

( फोटो ओळी )

व्होखार्ट कंपनीकडून जळगाव रोडने आंबेडकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी अज्ञात व्यक्तीने फाटकी गादी फेकून दिली. तिच्याकडे संशयाने पाहत जाताना हातगाडीवाला.

Web Title: Panic among the citizens of the mattress thrown on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.