पंचकल्याण प्रतिष्ठा उत्सव
By Admin | Updated: June 23, 2017 23:23 IST2017-06-23T23:21:51+5:302017-06-23T23:23:54+5:30
पुसेगाव : येथील श्री. १००८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे २३ जून रोजी पंचकल्याण उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

पंचकल्याण प्रतिष्ठा उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : येथील श्री. १००८ संभवनाथ व पार्श्वनाथ दिगंबर जैन तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे २३ जून रोजी पंचकल्याण उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
यावेळी ७ वा कलशयात्रा व शोभायात्रा काढण्यात आली. ध्वजारोहण सेनगावच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मंडप उद्घाटन नाभिराज माष्ट यांच्या हस्ते करण्यात आले. मंडप सुधी, भगवंतांचा अभिषेक व ग्रहभ कल्याणक, कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. मुनी श्री १००८ विशेष सागरजी महाराज यांचे प्रवचन झाले व आनंद यात्रा, आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकभक्त उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकुमार कान्हेड, कैलास भुरे, सुभाष कान्हेड, हिराचंद कान्हेड, संजय वाळले, विजयकुमार कान्हेड, उज्वला कान्हेड, माधुरी कान्हेड, माला भुरे, मीना वाळले, रचना कान्हेड, चंद कान्हेड, नैना भुरे, छाया भुरे, सीमा वाळले आदींनी परिश्रम घेतले.