पंचायत समिती सदस्य सहलीवर!
By Admin | Updated: September 12, 2014 00:26 IST2014-09-12T00:06:41+5:302014-09-12T00:26:40+5:30
रमेश शिंदे , औसा औसा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे़ येत्या रविवारी सभापतीची निवड होणार आहे़ दरम्यान या निवडीनिमित्ताने पंचायत समितीचे काही सदस्य सहलीवर

पंचायत समिती सदस्य सहलीवर!
रमेश शिंदे , औसा
औसा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे़ येत्या रविवारी सभापतीची निवड होणार आहे़ दरम्यान या निवडीनिमित्ताने पंचायत समितीचे काही सदस्य सहलीवर गेले आहेत़ त्यामुळे सभापती कोण होणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना कायम लागून आहे़
औसा पंचायत समिती ही १८ सदस्यांची आहे़ यामध्ये काँग्रेसचे ६, शिवसेनेचे ६, भाजपा -३, राष्ट्रवादी काँग्रेस-३ असे पक्षीय बलाबल होते़ परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला सदस्याचे अकाली निधन झाल्यामुळे सध्या १७ सदस्य आहेत़ भाजप-शिवसेना युतीकडे ९ तर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे ८ अशी सदस्य संख्या आहे़ सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या महिलामध्ये काँग्रेसकडे १ तर शिवसेनेकडे ३ अशी संख्या आहे़
सध्या सभापतीपद शिवसेनेकडे आहे तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे़ आता पुढील अडीच वर्षासाठी सभापती पद शिवसेनेकडे राहते की, काँग्रेस हिसकावून घेते याची उत्सुकता कायम आहे़ सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बहुतांश पंचायत समिती सदस्य हे सहलीवर गेले आहेत़ त्यामुळे आता कोण कोणास पाठींबा देतो आणि कुणाची सभापतीपदी वर्णी लागते याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे़ येत्या रविवारी या चर्चेस पूर्णविराम मिळणार आहे़
मागील वेळी भाजपा-शिवसेना युतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन शिवसेनेच्या ठमुबाई आडे या सभापती तर राष्ट्रवादीचे दिनकर मुगळे हे उपसभापतीपदावर विराजमान झाले होते़ सध्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या कोमल सूर्यवंशी, शिवसेनेच्या वर्षा गोरे, अनुसया मते, शोभा मोरे, या सर्वसाधारण गटातील महिला आहेत़ यापैकी कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता नागरिकांना आहे़
४पंचायत समितीचे बहुतांश सदस्य सहलीवर गेल्यामुळे तर काहीचा संपर्कच होत नसल्यामुळे सभापती निवडीसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे़ पंचायत समितीच्या आवारातही सभापती कोण होणार याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़