पे्रेमाचा केला चक्क ‘बाँड’

By Admin | Updated: July 14, 2016 01:37 IST2016-07-14T01:32:10+5:302016-07-14T01:37:02+5:30

औरंगाबाद : एका महाविद्यालयीन तरुणीवर दबाव टाकून तरुणाने चक्क ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’ असा बाँड लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Pamma's good 'Bond' | पे्रेमाचा केला चक्क ‘बाँड’

पे्रेमाचा केला चक्क ‘बाँड’

औरंगाबाद : एका महाविद्यालयीन तरुणीवर दबाव टाकून तरुणाने चक्क ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’ असा बाँड लिहून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या बाँडच्या आधारे तो तरुण तरुणीला गेल्या सहा महिन्यांपासून ‘ब्लॅकमेल’ करीत होता. ब्लॅकमेलिंगला वैतागलेल्या तरुणीने अखेर काल छावणी ठाणे गाठून फिर्याद दिली.
अमजद खान अजमेर खान (२४, रा. जाधववाडी) असे त्या तरुणाचे नाव असून, त्याला छावणी पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पडेगाव परिसरात राहणारी एक २३ वर्षीय तरुणी घाटी परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. काही महिन्यांपूर्वी आरोपी अमजद खानची तिच्यावर नजर पडली. तेव्हापासून त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पाठलाग करता करता तिच्याशी ओळख करून घेतली. नंतर मैत्री केली. जवळीक वाढविली.
धमकावून घेतल्या बाँडवर स्वाक्षऱ्या
सहा महिन्यांपूर्वी ती क्लासला जात असताना आरोपी अमजदने रस्त्यात तिला अडविले अन् अचानक एक बाँडपेपर तिच्यासमोर ठेवला. त्यावर स्वाक्षरी मार, असे त्याने तिला बजावले. अन्यथा तुला बदनाम करील, असे अमजदने तिला धमकावले. तरुणीने बाँडपेपरवर स्वाक्षरी मारली. त्यानंतर तिने बाँडवरील मजकूर वाचला. तेव्हा तिला धक्काच बसला. त्यावर लिहिलेले होते ‘आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही स्वखुशीने लग्न करणार आहोत’.
बाँडच्या आधारे ब्लॅकमेलिंग
बाँडवर स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी अमजद या तरुणीला सतत ब्लॅकमेलिंग करीत होता. माझ्याशी लग्न कर, माझ्यासोबत चल, असे तो तिला म्हणत असे. त्यामुळे ही तरुणी प्रचंड वैतागून गेली होती. तक्रार केली तर आपलीच बदनामी होईल, अशी भीती तिला सतावत होती.
दरम्यान, १२ जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही तरुणी पीईएस महाविद्यालयासमोरून जात असताना अमजदने तिला पुन्हा अडविले आणि ‘तू आता माझ्यासोबत चल’ असे तो म्हणू लागला. त्याने तिचा हात धरून ओढले. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेऊन या तरुणीने अखेर थेट छावणी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली हकीकत सांगितली.
लगेच पोलिसांनी तिच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला. अखेर तो जाधववाडीत राहत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे फौजदार आर. डी. सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी पहाटे आरोपी अमजदला घरातून अटक केली. फौजदार सौदागर या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
तरुण ट्रॅक्टरचालक अन् तरुणी ‘बीएचएमएस’ला
धक्कादायक बाब म्हणजे फिर्याद देणारी तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेत आहे. तर तिच्याकडून धमकावून प्रेमाचा बाँड लिहून घेणारा आणि लग्नासाठी तिच्या मागे लागलेला आरोपी अमजद खान अजमेर खान हा चक्क एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतो.

Web Title: Pamma's good 'Bond'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.